
अखेर हवाई दल आणि नागरी संरक्षण दलाच्या दरम्यान संवादासाठी ‘हॉट लाईन ’ कार्यान्वित
आपत्कालीन परिस्थितीतील शहरातील एकाहत्तर भोंगे अद्याप बंद
सॅपर्स येथील नागरी संरक्षण दल व्हाया येरवड्यातील बीएसएनएल ते हवाई दला दरम्यान हॉट लाईन सुरू ;
पुणे ः देशात युद्ध किंवा नैसर्गिक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास हवाई दल फक्त नागरी संरक्षण दलाच्या संपर्कात असते. हवाई दल युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती हाताळते तर नागरी संरक्षण दल शहरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थिती बाबत संदेश देणे, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम करते. पुणे शहरात नव्याने नागरी संरक्षण दल व लोहगाव हवाई दल यांच्या संवादासाठी ‘हॉट लाईन’ चे काम गेली अनेक वर्ष लालफितीत अडकले होते. या हॉट लाईनवर शहरातील कानाकोपऱ्यातील ७१ भोंगे वाजविले जाणार होते. मात्र , विभागीय आयुक्त कार्यालयाने नवीन प्रशासकीय इमारतीमधील नागरी संरक्षण दलाचे कार्यालयच काढून घेतल्यामुळे आपत्ती येण्याची आधीच आपत्ती आली होती. ऐन भारत व पाकिस्तान दरम्यान तणावाच्या वेळी भोंगे बंद होते. ते अद्याप सुरू झाले नाहीत.
शहरात आपत्कालीन परिस्थितीत एकाच वेळी लाखो नागरिकांना धोक्याची किंवा सुरक्षितते संदर्भात सूचना देणारे एकाहत्तर भोंगे सध्या बंद आहेत. पुर्वीची कालबाह्य यंत्रणा काढून टाकून नवीन अत्याधुनिक भोंगे बसविले जाणार आहेत. पूर्वी बाजीराव रस्ता येथील ‘ बीएसएनएल’ कार्यालय ते कॉन्सिल हॉल समोरील नवीन प्रशासकीय इमारती मधील नागरी संरक्षण दलाचे कार्यालय ते लोहगाव येथील हवाई दला पर्यंत ‘हॉट लाईन’ बसविण्याचे काम सुरू होणार होते. त्यानंतर शहरातील एकाहत्तर भोंगे सुरू होणार होते. मात्र, या ‘हॉट लाईन’ चे काम सुरू असतानाच विभागीय आयुक्त कार्यालयाने चक्क नवीन प्रशासकीय इमारतीमधील ’नागरी संरक्षण दलाचे’ कार्यालयाला ठाळे ठोकून त्यांना येरवड्यातील एका पडक्या इमारतीमध्ये स्थलांतर केले .
देशात युद्ध किंवा आपत्कालीन परिस्थितीत हवाई दल केवळ नागरी संरक्षण दलाच्या संपर्कात असते.शत्रू देशासाठी लढण्यासाठी हवाई दला सज्ज असते तर देशांतर्गत नागरिकांना आपत्कालीन सुचना देणे, त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याची जबाबदारी फक्त नागरी संरक्षण दलाकडे असते. केद्र सरकारने विशेष निधी देऊन सुरवातीला मुंबई व ठाणे शहरांतर्गत ‘हॉट लाईन’ टाकले आहे. या हॉट लाईनच्या माध्यमातून भोंगे वाजविले जातात. तर दुसऱ्या टप्प्यात पुणे शहरात ही हॉट लाईन टाकली जात आहे. बाजीराव रस्ता येथील ‘बीएसएनएल’ ते नागरी संरक्षण दलाचे कार्यालय असलेल्या नवीन प्रशासकीय इमारत ते लोहगाव येथील हवाई दला पर्यंत ही हॉट लाईन टाकली जाणार होती. त्यानंतर या हॉट लाईनच्या माध्यमातून हवाई दल व नागरी संरक्षण दल यांच्या मध्ये आपत्कालीन स्थिती संवादाचे हे एक महत्त्वाचे माध्यम असते. यासह या हॉट लाईनवर शहरातील एकाहत्तर भोंगे वाजविले जाणार आहेत. मात्र, याचे गांभिर्य नसलेल्या विभागीय आयुक्त कार्यालयाने चक्क नागरी संरक्षण दलाचे कार्यालय राज्य मागासवर्गीय विभागाला देण्याचे आदेश दिले .त्यामुळे नागरी संरक्षण दलाचे कार्यालय येरवड्यातील आळंदी रस्त्यावरील एका पडक्या इमारतीमध्ये स्थलातर केले आहे.

‘‘ पुणे शहरात पूर्वी ७१ भोंगे बीएसएनएल यंत्रणेवर अधारीत होते. स्वयंसेवक स्वत: सकाळी साडेदहा हे भोंगे सुरू करीत. मात्र ही यंत्रणा कालबाह्य झाली. त्यामुळे नवीन भोंग्यांसाठी केंद्र सरकारने निधी दिला आहे. त्यामुळे येरवडा येथील बीएसएनएल ते नवीन प्रशासकीय इमारती मधील संरक्षण दल कार्यालय ते लोहगाव येथील हवाई दला पर्यंत ‘हॉट लाईन’ साठी केबल टाकण्याचे काम सुरू होते. या हॉट लाईन वर हवाई दल व नागरी संरक्षण दला मध्ये संवादासाठी वापरले जाणार आहे. या हॉट लाईनवर शहरातील कानाकोपऱ्या पर्यंत आपत्कालीन स्थितीचे संदेश देणारे भोंगे बसविणार आहेत. मात्र, विभागीय आयुक्त कार्यालयाने नागरी संरक्षण दलाचे मध्यवर्ती कार्यालयच काढून घेतले आहे. त्यामुळे आपत्ती येण्या अगोदरच आपत्ती आली आहे.
राज्यातील सहा शहरातीलही भोंगे बंद !
राज्यात मुंबई, तारापूर, उरण, ठाणे, नाशिक आणि पुणे या सहा शहरात भोंगे होते. मात्र, या शहरातील भोंगे बंद आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबई व ठाणे शहरात हॉट लाईन टाकण्यात आली आहे. या हॉट लाईनवर भोंगे बसविण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात पुणे व नाशिक शहरात हॉट लाईन टाकण्यात येत आहे. त्यानंतर या शहरातील भोंगे सुरू होणार आहेत. मात्र, नागरी संरक्षण दलाचे मध्यवर्ती ठिकाणचे कार्यालयच काढून घेतल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देशाच्या संरक्षण दृष्टीनी अतिमहत्त्वाच्या पुणे शहरातील आपत्कालीनकालीन परिस्थिती वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.
नागरी संरक्षण दलाचे कार्यालय मागासवर्गीय आयोगाच्या ताब्यात
नागरी संरक्षण दलाचे कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये होते. मात्र, मागासवर्गीय आयोगाला जागा कमी पडते म्हणून फेब्रुवारी २०२४ ला ताब्यात देण्याचे आदेश विभागीय आयुक्तालयाच्या मालमत्ता विभागाने दिले. या कार्यालयाला तब्बल तीन कोटी रूपयांचे फर्निचर आवश्यक आहे. निधी न मिळाल्यामुळे गेली सात महिन्यांपासून या कार्यालय बंद आहे. तर नागरी संरक्षण दलाचे कार्यालय येरवड्यातील आळंदी रस्त्यावरील एका पडक्या व धोकादायक इमारतीमध्ये सुरू आहे. आपत्तीकाळात धाऊन जाणारेच आपत्तीमध्ये सापडले आहेत.