अभेद्य येरवडा कारागृहातून पलायन
पंधरा वर्षा पूर्वींची कथा
पुणे: आशिया खंडातील येरवडा हे कारागृह अतिशय सुरक्षित समजले जाते . मात्र पंधरा वर्षा पूर्वी एक कैदी येरवडा मध्यवर्ती कारागृहातून दोन उतूंग भिंती ओलांडून पलायन केले.याची कथा .
एक कैदी येरवडा मध्यवर्ती कारागृहात कारखाना विभागात फॅब्रिकेशनचे काम करत होता. कारागृहात कैद्यांना अनेक कामे दिली जातात. या कामाचा त्याना मोबदला दिला जातो. कैदी या काम दरम्यान तो दररोज दोन फुटाची लोखंडी रॉड लपवून आणत होता. त्या लोखंडी रॉड ला एका बाजूला आकडी तर दुसऱ्या बाजूला हुक अडकवण्यासाटी वर्तुळाआकार करत असे. असे अनेक लोखंडी रॉड त्याने येथील आवारात लपवून ठेवत असे. काही दिवसानंतर त्याने अनेक रॉड जमा केले. एका पहाटे सर्व कैदी उठल्या नंतर त्यांची गडबड सुरु होती . दरम्यान हा कैदी जमवलेले रॉड एकाला एक जोडून तो दोन भिंती ओलांडतो. त्यानंतर तो येरवड्यातून धूम ठोकतो. काही तासात हि बातमी वाऱ्यासारखी पसरते . येरवडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होतो. मात्र शेवट पर्यत पोलिसाना पलायन केलेला कैदी सापडत नाही. काही महिन्यानंतर तो कैदी अंतरिम जामीन घेऊन जेल रोड पोलीस चौकीत हजर होतो. त्या आधी आणि नंतर अद्याप कोणीच येरवडा मध्यवर्ती कारागृहातून कोणीव पलायन केले नाही. तयामुळे त्याला धाडशी पलायन म्हटले तर अतिशोक्ती वाटणार नाही