अमली पदार्थ विरोधी पथकाने एका आरोपीकडून जप्त केले पाच लाख ३९ हजार रुपयांचे अफीम
पुणे : गुन्हे शाखा क्रमांक एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार अमली पदार्थाच्या गैरव्यवहाराने अनुषंगाने गस्त घालत होते. येवलेवाडी येथील यश कॉम्प्लेक्स शिक्षकनगर, गल्ली क्रमांक दोन येथील फ्लॅट नंबर 203, कामठेपाटील नगर येथे अर्जुन सुखराम काला ( वय 30 ) याच्याकडे पाच लाख 13 हजार 160 रुपये किमतीचे 256 ग्रॅम 58 मिलिग्रॅम अफीम व 25 हजार 920 रुपये किमतीचे एक किलोग्रॅम 728 ग्रॅम अफीमची बोंडांची (पॉपी स्ट्रोची ) पावडर व जोडा चुरा अमली पदार्थ मिळून आला. तो जप्त करण्यात आला . आरोपी विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात एनपीडीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे शहरातील अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे ) निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार संदीप शिर्के, विशाल दळवी, प्रवीण उत्तेकर , संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विपुल गायकवाड, स्वप्निल मिसाळ यांनी केले