आंतरजातीय विवाह संकल्पनेला पाठिंबा देण्यासाठी उपक्रम
पुणे : ‘विचारवेध असोसिएशन’च्या पुढाकाराने आंतरजातीय विवाह संकल्पनेला पाठिंबा देण्यासाठी नवे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झालेल्या बैठकीत या उपक्रमांची घोषणा करण्यात आली.या उपक्रमांत इच्छुक युवक-युवतींसाठी समुपदेशन व मार्गदर्शन, आर्थिक सहाय्याचे सल्ला, जोडपे एकत्र आणण्यासाठी कार्यक्रम, व्याख्याने तसेच सुरक्षित निवासासाठी ‘सेफ हाऊस’ यांचा समावेश आहे. समाजात आंतरजातीय विवाहाबाबत असलेले गैरसमज दूर करून, विवाह करणाऱ्यांना आधार देण्याचा यामागचा मुख्य उद्देश आहे. ‘विचारवेध असोसिएशन’च्या वतीने सरिता आव्हाड यांनी पुण्यात प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
या उपक्रमांद्वारे केवळ विवाहासाठी आधारच नव्हे, तर सामाजिक बदलाची प्रक्रिया गतिमान करण्याचीही अपेक्षा आहे. इच्छुकांनी या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी अनिकेत साळवे ८७९६४०५४२९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.