आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शहराची सांस्कृतिक ओळख निर्माण करून देण्यासाठी महत्त्वाचा ठरेल – अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शहराची सांस्कृतिक ओळख निर्माण करून देण्यासाठी महत्त्वाचा ठरेल – अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-२०२५’ ला दिमाखात झाली सुरुवातरसिकांना विविध भाषेतील तब्बल ९० चित्रपट  मोफत पाहण्याची संधी

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर आंतरराष्ट्रीय नकाशावर एक सांस्कृतिक शहर म्हणून उदयास येण्यासाठी पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५’ सारखे सांस्कृतिक कार्यक्रम नक्कीच उपयुक्त ठरणार आहेत. या शहराची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून झालेली सुरुवात भविष्यकाळात भव्य स्वरुप धारण करेल. या सांस्कृतिक चळवळीला पुढे नेण्यासाठी या क्षेत्रातील जाणकरांनी सहकार्य करावे. नागरिकांच्या सहभागामध्ये याचे यश अवलंबून आहेअसे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले.

 

पिंपरी चिंचवड महापालिकापिंपरी चिंचवड फिल्म सोसायटीरयत शिक्षण संस्थेचे पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालय आणि मुंबा फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २९ मे ते ३१ मे याकाळात पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-२०२५’ चे आयोजन आकुर्डी येथील ग. दि. माडगुळकर सभागृह आणि चिंचवड मधील छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा फुले स्पर्धा परीक्षा केंद्र येथे केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आजगुरुवारी आकुर्डी येथील ग.दि.माडगुळकर सभागृहात अतिरिक्त आयुक्त खोराटे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

 

पिंपरी चिंचवड महापालिका उपायुक्त पंकज पाटीलविशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाडक्रीडा अधिकारी अनिता केदारीअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईरहभप प्रकाश महाराज मोरेउद्योजक विजयराव चौधरीगोरख कातुरेविजय बोत्रेलेखक शरद तांदळेरयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसलेअभिषेक अवचारदत्ता गुंडजय भोसलेडॉ.विश्वास शेंबेकरसायली शिंदेरयत विद्यार्थी विचार मंचाचे अ‍ॅड. धम्मराज साळवे आदी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय चित्रपटाची महोत्सवाची सुरुवात दीपप्रज्वलन व भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर चित्रपट महोत्सव आयोजित करण्यामागील भूमिका विषद करण्यात आली.

 

यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणालेपिंपरी चिंचवड शहराची ओळख उद्योगनगरी म्हणून आहे. शहर विकासात भौतिकआर्थिक विकासासोबत कलासांस्कृतिकसाहित्य आदी विविध क्षेत्रांतील विकास ही त्या शहराची ओळख निर्माण करण्यास महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच भविष्यात या शहराची ओळख उद्योगनगरीसोबतच क्रीडानगरीविद्यानगरीसांस्कृतिक नगरी व्हावीयासाठी महापालिका सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रमांना साथ देत असते. महापालिका आयुक्त शेखर सिंह हे त्यासाठी आग्रही पुढाकार घेतातअसे खोराटे म्हणाले.

मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम

या चित्रपट महोत्सवाला देश-विदेशातून चित्रपट निर्मातेदिग्दर्शक यांचीही उपस्थिती आहे. यासर्वांना मराठी भाषेतील चित्रपट जास्तीतजास्त बनवण्याचे आवाहन करतानाच अतिरिक्त आयुक्त खोराटे म्हणालेप्रत्येकाच्या आयुष्यात चित्रपटांचे महत्त्वाचे स्थान असते. चित्रपटामध्ये समाजाचे प्रतिबिंब असते. अनेक चित्रपटांमध्ये समाजाचे मूल्यभावना आणि समज बदलण्याची ताकद देखील असते. मराठी भाषेमध्ये आणखी दर्जेदार चित्रपट कशा पद्धतीने तयार करता येतीलयावर देखील विचारमंथन अशा चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. या भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम असून या माध्यमाचा चांगला वापर करून घेणे महत्त्वाचे आहे.

उपायुक्त पंकज पाटील म्हणालेपिंपरी चिंचवड शहराचा सांस्कृतिक विकास व्हावानागरिकांना वेगवेगळ्या कलाकृती पाहता याव्यातया उद्देशाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन पिंपरी चिंचवड शहरात केले आहे. या महोत्सवामध्ये राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय स्तरावरील तब्बल ९० चित्रपट,  लघुपटमाहितीपटअ‍ॅनिमेशन चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहेत. शहरातील जास्तीतजास्त नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावाअसे आवाहन पाटील यांनी केले.

 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर म्हणालेमराठी चित्रपटांचे मूल्यमापन अशा महोत्सवाच्या माध्यमातून होईल. पिंपरी चिंचवड शहरातील कलाकारांना एकत्र आणण्याचे काम या महोत्सवाच्या निमित्ताने झाले आहे. कोणत्याही शहराचे मूल्यमापन हे केवळ तेथील भौतिक पायाभूत सुविधांवर नाही तर तेथील सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यावरून होत असते. त्यासाठी अशाप्रकारचे चित्रपट महोत्सव उपयुक्त ठरत असतात. शहरामध्ये कलाकारांना बळ देण्यासाठी महापालिकेसारखी संस्था पुढे येत आहेही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम राबवल्यामुळे विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रोत्साहन मिळेलव ते नवनिर्मितीच्या अविष्कार करून शहराचा सांस्कृतिक वारसा पुढे नेतील. 

उद्योजक गोरख कातुरेविजयराव चौधरीविजय बोत्रेप्राचार्य डॉ.पांडूरंग भोसलेशरद तांदळे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून अभिषेक अवचार यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यामागील भूमिका मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.कामायनी सुर्वे व प्रा. विक्रांत शेळके यांनी केले तर महापालिकेचे विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी आभार मानले.

 

 

 येथे पाहता येणार मोफत चित्रपट

 

स्थळ : १)  ग. दि. माडगूळकर सभागृहसेक्टर २६प्राधिकरणनिगडीपिंपरी-चिंचवडपुणे,

                  महाराष्ट्र ४११०४४

           २)  महात्मा फुले स्पर्धा परीक्षा केंद्रछत्रपती संभाजी नगरचिंचवडपुणे,

                 महाराष्ट्र – ४११०४४

                दिनांक :  २९ मे ते ३१ मे २०२५

                वेळ :  सकाळी १० ते रात्री ८

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...