
आजम शेख अधिकारी न होता देशसेवेचा अनोखा प्रवास
लातूर जिल्ह्यातील गाधवड गावातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका युवकाने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि
एमबीए पूर्ण करून आयबीएम व टाटा सारख्या कंपन्यांत नोकरी केली. खाकी वर्दीची आवड असल्याने कोणताही
क्लास न लावता यूपीएससी परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला. मात्र, कॅडरचा प्रश्न आणि मित्र-गुरू
अली मर्चेंट यांच्या सल्ल्यामुळे आयपीएस होण्याऐवजी व्यवसायाचा मार्ग निवडला.
२०११ मध्ये पुण्यात एका छोट्या फ्लॅटमधून एएम इन्फोवेब कंपनीची सुरुवात झाली. आज या कंपनीत दोन हजारांहून
अधिक युवक-युवती कार्यरत असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. अमेरिकन नागरिकांसाठी आरोग्यसेवेचे काम
करताना अनेकांचे जीव वाचविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना, अनाथ आश्रमांना, वृद्धाश्रमांना मदत केली जाते
आणि पोलिस दलासाठीही विविध उपक्रम राबविले जातात.
खाकी वर्दी घालता आली नाही तरी पोलिसांवरील प्रेम कायम राहिले आहे. पुण्यातील पोलिस स्टेशनांना आवश्यक
तेव्हा मदत केली जाते. कोरोना काळात पोलिसांना आवश्यक साधनसामग्री आणि लसीकरणासाठी मदतीचा हात
पुढे करून कर्तव्य बजावले. समाजसेवेबरोबरच हजारो युवकांना रोजगार देत देशसेवा घडविण्यात त्यांनी मोलाचा वाटा
उचलला आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन दैनिक महा मेट्रो तर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.