पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कुल अँड आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज फॉर गर्ल्स ‘ ,अँग्लो उर्दू बॉईज स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ,एम.सी.इ.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बारावी परिक्षेत यश मिळवले. संस्थेचे अध्यक्ष डॉ .पी ए इनामदार,उपाध्यक्षा आबेदा इनामदार ,सचिव प्रा. इरफान शेख,अली रजा इनामदार,हनीफ शेख,मुख्याध्यापक राज मुजावर,प्राचार्या सौ.रोशन आरा शेख,मुख्याध्यापिका असफिया अन्सारी ,यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल अँड ज्युनियर कॉलेजचा निकाल ९४ टक्के लागला. विज्ञान शाखेचा निकाल ९७ टक्के इतका लागला.कला शाखेचा निकाल ५६.२५ टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल ९६ टक्के इतका लागला. विज्ञान शाखेतून ७१.५० टक्के गुण मिळवून शेख आतीफ अशपाक प्रथम आला.कला विभागात शेख मोहम्मद अकबर ६३.५० टक्के गुण मिळवून प्रथम आला तर कॉमर्स विभागात खान शेहझान इरफान ७३.८३ टक्के गुण मिळवून प्रथम आला .
कला शाखेचा निकाल ९६ टक्के निकाल लागला तर एच एस व्ही सी शाखेचा निकाल ९६.९६ टक्के लागला.कु बडगुजर रूशदा अमजदअली ही विद्यार्थीनी ९३.१७ टक्के गुण मिळवून कला शाखेत व काॅलेज मध्ये प्रथम आली .
वाणिज्य विभागात कु सुभेदार शिफा शफीक ही ९२.११ टक्के मिळवून प्रथम आली .कु शेख आलिया जफर ही ८५ टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम आली.तर कु शेख बुशरा जाकीर अहमद ही व्होकेशनल ( एच एस व्ही सी ) शाखेत ८५.१७ टक्के गुण मिळवून प्रथम आली .