आझम कॅम्पस मध्ये मंगळवारी वृक्षारोपण
पुणे: आगामी आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त आझम कॅम्पसमध्ये महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवारीआझम कॅम्पस येथे होणार आहे.
या उपक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार, एमएमई अॅण्ड आरसीच्या अध्यक्षा अबेदा पी. इनामदार ,एचजीएमएई ट्रस्टचे मानद सचिव जुबेर आर. शेख आणि एमसीई सोसायटीचे सचिव इरफान जे. शेख यांनी केले आहे.