आरक्षणाच्या उप वर्गीकरणासाठी लाखोंच्या संख्येने मातंग समाजाचा मंगळवारी मंत्रालयावर महाआक्रोष मोर्चा

Dilip KurhadeSocialPune18/05/202573 Views

आरक्षणाच्या उप वर्गीकरणासाठी लाखोंच्या संख्येने मातंग समाजाचा मंगळवारी मंत्रालयावर महाआक्रोष मोर्चा

 आंदोलनात मातंग समाजाने लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा — रमेश बागवे

पुणे :  अनुसूचित जातींमधील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय मिळावा यासाठी आरक्षणाचे अबकड असे वर्गीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी मातंग समाज मंगळवारी लाखोंच्या संख्येने मुंबईवर महाआक्रोश मोर्चा काढणार आहे .या महा आक्रोश मोर्चाला मातंग समाजाने लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मातंग समाजातील सर्वपक्षीय व सर्व संघटनेच्या नेत्यांकडून आज पत्रकार परिषदेत करण्यात आले .
सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आक्रोश महाआंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन २० मे २०२५ रोजी, मुंबईच्या आझाद मैदानात दुपारी १ ला* होणार आहे. या आंदोलनाचा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून ते येत्या जून २०२५ पासून लागू करवे .उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमधील दुर्लक्षित घटकांना शैक्षणिक संधी, शासकीय नोकरी व योजनांचा थेट लाभ मिळू शकेल. तरी “राज्य शासनाच्या विविध योजनांपासून आणि आरक्षणाच्या थेट लाभापासून अनेक लहान लहान उपगट वंचित राहत आहेत. त्यामुळे हक्काचे आरक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपवर्गीकरण अत्यावश्यक झाले आहे अशी समाजाची मागणी आहे.
या आंदोलनात सर्व पक्षीय अनेक मान्यवर नेते व लोकप्रतिनिधी सहभागी होणार असून,

या आंदोलनाचे नेतृत्व माजी गृहराज्यमंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे ,आमदार सुनील कांबळे,आमदार अमित गोरखे,आमदार जितेश अंतापूरकर,दलित महासंघाचे नेते प्रा.मच्छिंद्र सकटे,अखिल भारतीय कांग्रेस पक्षाचे सचिव रवींद्र दळवी ,माजी आमदार मधुकरराव घाटे,
माजी आमदार नामदेव जयराम ससाणे,माजी सभागृह नेते ,नगरसेवक सुभाष जगताप,विजय डाकले,अनिल हतागळे ,माजी नगरसेविका स्वाती लोखंडे ,उषा नेटके ,अँड.एकनाथ सुगावकर, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, पंडित सूर्यवंशी ,मारुती वाडेकर ,अशोक लोखंडे ,राम चव्हाण*यांसारखे अनेक नेते आंदोलनात सहभागी होणार आहेत.
सरकारने लवकरात लवकर आरक्षणाचे उपवर्गीकरण करून न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अजूनतीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे येणार्‍या मंगळवारी आझाद मैदानावर आयोजित केलेल्या आंदोलन सहभागी होण्याचे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले .
पुण्यातील या पत्रकार परिषदेस माजी गृहराज्यमंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे ,लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णूभाऊ कसबे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष जगताप ,माजी नगरसेवक अविनाश बागवे,अनिल हतागळे ,क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे ,माजी नगरसेविका स्वाती लोखंडे ,सुखदेव अडागळे ,राजश्रीताई अडसूळ,उषा नेटके ,यासह पुण्यातील विविध पक्ष संघटनाचे प्रमुख नेते उपस्थित होते .

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...