इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जचा पदग्रहण सोहळा संपन्न
पुणे: मुकुंदनगर येथे इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जचा नूतन पदाधिकारी मंडळाचा पदग्रहण सोहळा नुकताच झाला. पदग्रहण सोहळा उत्साहात आणि दिमाखात पार पडला. कार्यक्रमाला अनेक पाहुण्यांसह क्लबच्या सदस्यांनी हजेरी लावली होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि ईशस्तवनाने झाली. त्यानंतर मागील वर्षीच्या क्लबच्या कार्याचा आढावा घेताना तत्कालीन अध्यक्षा शुभदा केळकर यांनी आपल्या कार्यकाळातील उल्लेखनीय उपक्रम, सेवाभावी कार्य आणि समाजोपयोगी प्रकल्पांची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी नूतन अध्यक्षा उज्ज्वला नवले यांच्याकडे कार्यभार सोपवला.
उज्ज्वला नवले यांची अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात आगामी वर्षातील उद्दिष्टे सादर केली. यामध्ये शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि बालकल्याण यांसारख्या विविध क्षेत्रातील उपक्रम राबवण्याची योजना त्यांनी मांडली. “क्लबच्या सेवाभावाला सामाजिक परिणामकारकतेची जोड देणे हा आमचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले .
नवीन कार्यकारिणीतील इतर पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्षा जयश्री तांबोळे, सचिव सुविधा नाईक, कोषाध्यक्ष अंजली देशपांडे, शोभा कुंजीर आणि देवयानी देशमुख यांचा समावेश होता. यांच्यासह कार्यकारी मंडळाचे इतर सदस्य यांचीही औपचारिक घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इनरव्हील डिस्ट्रिक्ट 313 च्या चेयरमन डॉ आशा देशपांडे आणि विविध क्लबच्या मान्यवर सदस्यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. त्यांनी पुणे विंग्ज क्लबच्या कार्यपद्धतीचे व सामाजिक योगदानाचे विशेष कौतुक केले.
यावेळी आबासाहेब अत्रे दिन प्रशालेतील इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थिनींना गणवेश, वार्षिक फी व शैक्षणिक साहित्य दिले.
कार्यक्रम संयोजित करण्याची महत्वाची भूमिका अनुराधा हाटकर यांनी पार पाडली. संयोजक समिती, क्लबच्या सदस्यांनी केलेल्या मेहनतीचे कौतुक केले. नवीन कार्यकारिणीच्या कार्यकाळास शुभेच्छा देत हा पदग्रहण सोहळा संस्मरणीय ठरला.