
उच्चभ्रु सोसायटी सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर छापा
पुणे : धनकवडी येथे एका उच्चभ्रु सोसायटी सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर सहकारनगर पोलीसांनी छापा टाकुन हुक्का फ्लेवर साहित्यासह पाच जणांना अटक केले. पोलीसांना इमारतीमध्ये एका सदनिकेतील हॉलमध्ये एकुण सहा टेबल मांडलेले दिसले. त्यामधील चार टेबलवर आठजण हुक्का फ्लेवरचे सेवन करत होते. हॉटेल मालक राजसिंग भजनसिंग गोरोवाडा ( वय ३५ वर्षे, रा. राजमुद्रा सोसायटी, धनकवडी), पारस परमानंद शर्मा ( वय २४ वर्षे रा. सदर मुळ रा. नेपाळगंज जि. बाके नेपाळ ), सुभाष मानसिंग गिरी ( वय २० वर्षे , रा. कंचनपुर जि. बिलोरी नेपाळ ) , तिलक भोला तिवारी ( वय ३५ वर्षे रा. सदर मुळ रा. टिकापुर जि. कैलानी नेपाळ ) , नारायण मेघे आचार्य ( वय ३४ वर्षे , रा. रा.टिकापुर जि. कैलानी नेपाळ ) याना अटक केले.
पोलीसांनी हॉटेलच्या किचनची पाहणी केली असता तेथे विविध फ्लेवरचे हुक्का भरलेले चिलीमसह टेबलवर मिळुन आले. हुक्का पॉट व साहित्य तसेच किचनमधील विविध फ्लेवरचे हुक्का भरलेले चिलीम मिळुन आल्याने १२ हजार ४९५/- रु कि.चा माल पंचासमक्ष जप्त केले . आरोपीविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले.
ही कामगीरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग राजेश बनसोडे , पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, मिलींद मोहीते, सहा. पोलीस आयुक्त ( स्वारगेट विभाग) धन्यकुमार घोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोउनि गणेश कर्चे, सद्दामहुसेन फकीर, सहा. पोउनि बापु खुटवड, व पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतरे, किरण कांबळे, बजरंग पवार, सागर सुतकर, आशिष ढमाळ, निखील राजीवडे, अभिजीत वालगुडे, महेश भगत, आकाश किर्तीकर, खंडु शिंदे, अभिमान बागलाने, अमित पदमाळे, मारोती नलवाड, रफीक तडवी यांनी केली.