एटीएम वर दरोडा टाकणाऱ्या पर राज्यातील टोळीला देहूरोड पोलिसांनी रंगेहत पकडले
पिंपरी: मागील दोन महिन्यापासून विठ्ठलवाडी देहूगाव येथील एसबीआयच्या बँकेची एटीएम फोडून 16 लाख 87 हजार चारशे रुपये रोख रक्कम चोरीचा गुन्हा घडला होता. एटीएम चोरी प्रकरणाच्या अनुषंगाने एटीएम चोरीचा प्रकार घडणार नाही याकरिता पोलिसांनी रात्रगस्त वाढविली होती.
सोमवारी ( ता. २६) रात्री दोनच्या सुमारास देहूगाव- आळंदी रोडवर थ्री एटीएम नावाचे इंडस बँकेचे एटीएम आहे. येथून काही अंतरावर पांढऱ्या रंगाची कार उभी असल्याची पोलिस अंमलदार याना दिसली. या मोटारीमध्ये संशयास्पद हालचाली होत असल्याचे दिसले. बीट मार्शल समाधान पटावकर, पोलीस शिपाई किरण पाटील यांनी मोटार कडे जाऊन मोटर थांबण्याचा प्रयत्न केला. मात्र हि मोटार भरधाव वेगाने आळंदी रस्त्याकडे गेली. मोटारी मध्ये दोन पुरुष एक महिला बसलेली दिसली. बीट मार्शल पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ एटीएम कडे धाव घेतली. त्यावेळी इंडस बँकेचे एटीएम चे शटर थोडे उचकटलेले व आतून उजेड बाहेर येत असल्याचे दिसले.
आतील भाऊ बाजूस काय तरी सामान जमिनीवर पडल्यासारखे आवाज आल्याने एटीएम चोरीचा संशय आला . बीट मार्शल व पोलीस अंमलदार त्यांनी रात्रगस्त पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जोएब शेख यांना फोन द्वारे माहिती दिली आणि मदती करता बोलावले. पोलीसानी शटर उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी एटीएम मध्ये दोन सडपातळ पुरुष गॅस कटरच्या साह्याने एटीएमची तोडफोड करत असल्याचे दिसले. पोलिसांना पाहून त्या दोन व्यक्तींनी जोरदार आरडाओरडा शिवीगाळ व पोलिसाच्या दिशेने दगडफेक केली. त्यांची झटापट करू लागले. थोड्याच वेळात रात्रगस्त पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई सोपान वालेकर हे घटनास्थळी आले. त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून दोन्ही दरोडेखोराना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली. आरोपी मुस्तफा मोबीन खान ( वय 30 वर्ष ) मुस्तकीन मोबीन खान ( वय 25 वर्ष, दोघे राहणार हरियाणा ) तसेच सोबत आलेले व कार म्हणून पळून गेले तीनजण फरार आहेत . त्यांच्या टोळीचा मोरक्या हा युसूफ खान असून ही टोळी हरियाणा राज्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेबाबत बीट मार्शल वरील पोलिस अंमलदार पोलीस शिपाई समाधान विष्णू पटावकर यांनी दिल्या तक्रारीवरून आरोपीवरुद्ध दोघांना अटक केली आहे.
उल्लेखनीय कामगिरी पिंपरी चिंचवड आयुक्ताचे आयुक्त विनय कमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर , अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 विशाल गायकवाड , सहाय्यक पोलीस आयुक्त (वाकड ) सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जोएब शेख, पोलीस शिपाई समाधान पटावकर, पोलीस शिपाई किरण पाटील, पोलीस शिपाई सोपान वालेकर यांनी तपास केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक जोएब शेख करीत आहेत