कर्जाची परतफेड करण्यासाठी चुलत भावाच्या घरी चोरी करणारा अटक

Dilip KurhadePolicePuneUncategorized10/02/202641 Views

कर्जाची परतफेड करण्यासाठी चुलत भावाच्या घरी चोरी करणारा अटक

पुणे : मुंढवा येथील फिर्यादीचे राहते प्लॅटमध्ये कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरफोडी चोरी केली होती. चोरट्याने एकुण ३७९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एक किलो चांदी तसेच रोख रक्कम दोन लाख रुपये असे एकुण २२ लाख ११ हजार रूपयांचा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार मुंढवा पोलीस ठाण्यात नोंदविली गेली होती.
या गुन्हयाचे अनुषंगाने मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देवुन, पाहणी केली. हा प्रकार कोणीतरी ओळखीच्या व्यक्तीने केल्याचा संशय निर्माण झाला. त्या दृष्टीकोनातुन घटनास्थळाचे आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेज व गोपनिय बातमीदाराचे मार्फतीने या गुन्ह्याचा कौशल्यपुर्ण तपास केला . फिर्यादी यांचा नातेवाईक आशुतोष अशोक कासवा, ( वय ३८ वर्षे, रा. सर्वेनंबर ९४/बी, मुंढवा ) यास गुन्हयाचे अनुषंगाने ताब्यात घेवुन चौकशी केली . आरोपीने गुन्हयाची कबुली दिली. दाखल गुन्हयातील फिर्यादी याचे चोरीस गेलेले सोन्याचे दागीने व एक किलो चांदी तसेच रोख रक्कम असा एकुण २२,११,०००/- रु.कि.चा ऐवज हस्तगत करण्यात आला.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त, परीमंडळ ६, राजकुमार शिंदे. सहा. पोलीस आयुक्त अतुल कुमार नवगिरे यांचे मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्मिता वासनिक यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, गणेश पिंगुवाले, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण, सहा. पोलीस फौजदार, राजु कदम, पोलीस अंमलदार शिवाजी जाधव, योगेश गायकवाड, राहुल मोरे, राहुल धोत्रे, शिवाजी धांडे अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर व योगेश राऊत यांनी केली.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...