कारागृहात मिळते तंबाखु, सिगारेट आणि अंमली पदार्थ सुद्धा ! ; कारागृह भाग- ३

कारागृह भाग ३
येरवडा मध्यवर्ती कारागृहात ज्या कैद्यांकडे पैसे आहेत. त्याला चमचमीत जेवण, व्यसनासाठी तंबाखु, सिगारेटच नव्हे तर गांजा या सारखे अमली पदार्थ सहज मिळतात. ही यंत्रणा इतकी सक्षम आहे की येरवडाकारागृहातील रक्षकापासून ते मंत्रालयातील सचिव दर्जा पर्यंतही लिंक असल्याची चर्चा आहे. कारागृहातील महिन्याला जेवणावरच तीस कोटी रूपयांपर्यंत खर्च होतो. त्यामुळे वर्षाला कोट्यवधी रूपयांची उलाढाल होणाऱ्या कारागृहाचे आर्थिक गणित सर्वसामान्यांना समजण्याच्या पलिकडचे आहे. याठिकाणी लेखा परिक्षण झाले तरी एक रूपयांचा भ्रष्टाचार समोर येत नाही. इतके सफाईदारपणे येथील व्यवहार चालत असतो.

कारागृहात मिळते तंबाखु, सिगारेट आणि अंमली पदार्थ सुद्धा

कारागृहात आलेल्या एखाद्या कैद्याला व्यसन असल्यास त्याला दरमहा हजारो रूपये खर्च करावा लागतो. तंबाखुची किंमत बाहेर दहा रूपये असल्यास कारागृहात त्याची किंमत शंभर रूपये असते. सिगारेटची तर किंमत सांगायलाच नको. याही पेक्षा पैसे मोजल्यास गांजा हमखास मिळतो. त्यामुळे पैसे असलेल्या कैद्यांना चमचमीत जेवण, दूध, अड्यांचा खुराक व अमली पदार्थ मिळत असल्यामुळे ते ऐशोआरामात कारागृहात जीवन जगत आहेत. सभोवती टोळी जमवून कारागृहावर जणू काहीजण राज्य करताना दिसतात. अशा कैद्यांना कारागृहात व्हिआयपी वागणूक असते. कारागृहातील तुरूंग रक्षकही त्यांच्या दिमतीला असतात. पाहिजे तेव्हा ते मोबाईलवर बाहेर संपर्क करू शकतात. तर काहीजण गुन्हेगारी सुत्र कारागृहातून हलवतात. त्यांना सहाजिकच कारागृहातील मंडळींची मदत असते. याचा थांगपत्ता ना कारागृह प्रशासनाला असतो ना पोलिसांना.

येरवडा कारागृह हे गुन्हेगारांचे विद्यापीठ

येरवडा मध्यवर्ती कारागृह हे गुन्हेगारांचे विद्यापीठ म्हणून संबोधले जाते. कारण याच ठिकाणी अनेक गुन्हेगारी टोळ्या तयार होतात. नवीन आलेल्या कैद्यांचे ब्रेनवॉश करून त्यांना आपल्या टोळीत घेण्याचे प्रयत्न केले जातात. या ठिकाणी नविन कैद्यांना दिवस-रात्र जणू एक प्रकारचे प्रशिक्षणच देणे सुरू असते. गुन्हेगारी विश्‍वातील तंत्र आणि मंत्र हे कैदी शिकत असतात. त्यामुळे बाहेर जाऊन गंभीर गुन्हे करणे आणि पुन्हा आत येणे असे दृष्टचक्र नेहमी सुरू असते. त्यामुळे गुन्हेगारी विश्‍वास येरवडा कारागृहाला गंमतीने गुन्हेगारांचे विद्यापीठ म्हटले जाते. एवढेच नाही तर येथे आलेले कैदी विविध गुन्ह्यांतील असतात. त्यामुळे त्यांचे खटले, वकिलां बद्दल चर्चा करता करता त्यांना कायद्याचीही चांगली ओळख होते. ते इतरांना या बाबत विधी साक्षर करतात. चांगले वकिल सुचवितात तर काहीजण एखाद्याला आर्थिक मदत करून बाहेर काढण्यासाठी मदतही करतात.

येरवडा कारागृह एक गाव

येरवडा मध्यवर्ती कारागृहात प्रवेश केल्यानंतर कारागृहाच्या इमारतीच्या तळ आणि पहिला मजला आहे. तळमजल्यावर वरिष्ठ तुरूंगाधिकारी, तुरूंग अधिकारी यांचे कार्यालय आहे. तर पहिल्या मजल्यावर प्रशासकीय कार्यालय व कारागृह अधिक्षकांचे कार्यालय आहे. कारागृहात तीस बराक आहेत. यासह मध्यवर्ती भागात सेंट्रल किचन, गिरणी, किचन शेजारी दोन बराक, धान्य गोदाम, रुग्णालय, प्रयोगशाळा, औषधांची खोली, वैद्यकीय अधिकाऱ्यांची खोली, मुलाखत कक्ष, ग्रंथालय, मनोरंजन सभागृह, सराईत गुन्हेगारांसाठी अतिसुरक्षित खोल्या आदींची रचना आहे. एक प्रकारे सात हजार कैद्यांचे एक गावच या ठिकाणी वसले आहे.

‘‘ कारागृहातील कैद्यांना जेवण सरकारने दिलेल्या नेमून दिलेल्या प्रमाणात असते. यासह येथील भांडारातील वस्तू एमआरपी प्रमाणे दिले जातात.”

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Loading Next Post...
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...