किडनी प्रत्यारोपण रॅकेट गुन्ह्यामध्ये डॉ अजय तावरे याची २ जून पर्यंत पोलीस कोठडी
पुणे: रुबी हॉल क्लिनिक तेथील अवैद्य किडनी रॅकेट बाबत कोरेगावपार्क पोलीस ठाण्यात मानवी अवयव प्रत्यारोपण अन्वये गुन्हा दाखल आहे. तत्कालीन पुणे आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ संजोग सीताराम कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून ११ मे २०२२ रोजी हा गुन्हा दाखल आहे.
या गुन्हाच्या तपासामध्ये आतापर्यंत सात आरोपी विरूद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे . दरम्यान डॉ अजय अनिरुध्द तावरे हे ससून सर्वोपचार रुग्णालय यांचेकडील रिजनल ऑथोरायजेसशन कमिटीचे यांचे अध्येक्षतेखाली कामकाज होत होते. दरम्यान डॉ अजय तावरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून बनावट व्यक्ती व बनावट कागदपत्रांच्या आधारे किडनी स्वॅप प्रत्यारोपण करण्याची परवानगी दिली होती. या समितीचे तत्कालीन अध्यक्ष व ससून हॉस्पिटलचे वैद्दकीय अधीक्षक डॉ अजय तावरे यांचा गुन्हन्यातील सहभाग निष्पन्न झाला आहे.
आरोपी डॉ अजय तावरे हा पोर्शे कार अपघात गुन्हामध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत होते. न्यायालयाच्या प्रोडक्शन वॉरंटने ताब्यात घेऊन नमूद गुन्हात डॉ तावरे याना बुधवारी अटक करण्यात आली. या गुन्हात रिमांड घेण्यासाठी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालायने आरोपीची दोन जून पर्यंत पोलीस कोठडीची रिमांड मंजूर केली आहे. या गुन्हाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर ( गुन्हे ) गणेश इंगळे करीत आहेत.