खराडी येथील सुंदरबाई मराठे विद्यालयाचा निकाल १०० टक्के

Dilip KurhadePuneEducation13/05/2025266 Views

विद्यालयात ९७ टक्के गुण मिळून प्रथम आलेला उद्धव सुरडकर या विद्यार्थाला पेढा भरविताना विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय सोमवंशी

खराडी येथील सुंदरबाई मराठे विद्यालयाचा निकाल १०० टक्के

पुणे: खराडी येथील गेनबा सोपानराव मोझे संस्थेच्या सुंदरबाई मराठे विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यालयाने आपल्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे..
विद्यालयात एकूण १७४ विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले होते. सर्व च्या सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले .नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेले एकूण विद्यार्थी २७ ,असून ८० ते ९० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३८ एवढी आहे .६०टक्के ते ७९ टक्के मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८३ एवढी आहे.विद्यालयात .सुरडकर उद्धव हा विद्यार्थी ९७ टक्के गुण मिळून प्रथम आला आहे, तर गाडेकर वैष्णवी प्रभाकर व खोरे स्वरूप सुभाष यांनी अनुक्रमे ९६.२० टक्के गुण मिळून विद्यालयात द्वितीय क्रमांक मिळवला आहे .
पाटील कर्तव्य महिंद्र हा विद्यार्थी ९५.८० टक्के गुण मिळून तृतीय आला आहे. विद्यालयात दरवर्षी जादा तासिका,दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीतील जादा तासिका , तीन तीन सराव परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात. त्या मध्ये सातत्य ठेवल्याने विद्यालयाने १०० टक्के निकालाची हॅट्रिक केली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक विलास भंडलकर, विद्या कव्हेकर, बाळासाहेब जाधव, पर्यवेक्षक सुनील वळसे मुख्याध्यापक संजय सोमवंशी व सर्व विषय शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ मोझे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे, शाळा समिती अध्यक्षा अलका पाटील यांनी कौतुक व अभिनंदन केले.
उद्धव चे वडील इलेक्ट्रिशन असून आई गृहिणी आहे . एक लहान भाऊ असून तो ही विद्यालयात शिक्षण घेत आहे.उद्धव हा इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता शिष्यवृत्ती यादी मध्ये आला आहे .त्याने आज पर्यंत अनेक विज्ञान प्रदर्शनात भाग घेऊन प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले असून त्याने शास्त्रज्ञ होण्याचा माणस व्यक्त केला आहे. त्याने निकाला बाबत शाळेतील शिक्षक व आई वडिलांचे आभार मानले.

 

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...