खासदारांच्या   जनता दरबारात इच्छुकांच्या फ्लेक्सची मांदियाळी

Janta Darbar
खासदारांच्या   जनता दरबारात इच्छुकांच्या फ्लेक्सची मांदियाळी
बॅनरच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शनाचा केविलवाणा प्रयत्न ; मुरलीधर मोहळाची उघड नाराजी
 
पुणे : येरवड्यातील डॉ.  नानासाहेब परुळेकर विद्यालयात केंद्रीय सहकार व विमान वाहतूक मंत्री मुरलीधर  मोहोळ यांचे सेवा संपर्क अभियान  पार पडले.  या जनता दरबारात इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली होती.  आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारापासून ते कार्यक्रम स्थळापर्यत बॅनरबाजी केली होती.  हे बॅनर व फ्लेक्स पाहून  मोहोळ यांनी या ठिकाणी बॅनर ची  काय आवश्यकता आहे.  हे बॅनर प्रभागात हवे होते असे म्हणत कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली.जनता दरबार   संदर्भात बोलताना मोहोळ म्हणाले, ”  खासदार जनसंपर्क सेवा अभियानांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जनता दरबारचे आयोजन करत असतो . येरवड्यातील डॉ.  नानासाहेब परुळेकर विद्यालयातील आठवा जनता दरबार आहे.  या ठिकाणी लोहगाव, धानोरी, कळस , टिंगरेनगर व येरवडा परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते.  जनता दरबारामध्ये महापालिका , राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या निगडित असलेले प्रश्न नागरिक घेऊन येत असतात . काही समस्या तात्काळ सुटतात तर काही समस्यांना वेळ लागू शकतो मात्र अशा समस्यांचा पाठपुरावा करतो.
लोहगाव येथील 900 मीटर हवाई हद्द संदर्भात विचारले असता काही  दिवसात स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.  यामध्ये रस्त्याचा विषय असेल विकास आराखडा असेल यासंदर्भात लोहगाव विमानतळ सदर्भा  एक स्वतंत्र बैठक आयोजित केली जाणार आहे.  तर लोहगाव विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज विमानतळ असे नामकरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव दाखल केला आहे.  लवकरच त्याचा निर्णय लागेल.   आळंदीपर्यंत मेट्रो जाणार आहे यासाठी महा मेट्रो संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासोबत बैठक झाली आहे . आळंदी  मेट्रोसाठी स्वतंत्र डीपीआर करण्याच्या सूचना दिल्या आहेत , असे मोहोळ यांनी सांगितले

जनता दरबारात अनेक टेबल रिकामे !
केंद्रीय सहकार व विमान वाहतूक मंत्री मुरलीधर  मोहोळ यांचे सेवा संपर्क अभियान  अर्थात जनता दरबारात अनेक टेबल रिकामे होते. यामध्ये म्हाडा , राष्ट्रीयकृत बँकेचे मुद्र्रा लोन, रोजगाराच्या विविध योजना माहिती यासह टेबल रिकामे होते. जनता दरबारात चारशेच्यावर नागरिकांचे प्रश्न मोहोळ यांनी ऐकले.

मातेने  दिले मोहोळ याना जेवणाचे आमंत्रण !
जनता दरबारात  पोरवाल रस्तयावरील एका हॉटेल मध्ये काम करणारी महिला आली होती.  महिलेने  आपण विधवा असून संजय गांधी निराधार योजना लागू व्हावी अशी मागणी केली. मोहोळ यांनी  “आई”  म्हणुन संबोधल्याचे  महिलेने सांगितले. हे ऐकून समाधान वाटले . काम नाही झाले तरी दोन शब्द गोड बोलले याचे समाधान आहे.  त्यांना ( मोहोळ )  मी काम करीत असलेल्या हॉटेल मध्ये  स्वखर्चाने जेवणासाठी आमंत्रण दिले आहे. त्याला खासदार साहेबानी होकार दिल्याचे महिलेने सांगितले.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...