गजानन पडघन
कर्तव्यनिष्ठ सैनिक ते समाजसेवक
गजानन पडघन यांचा जन्म 26 ऑगस्ट 1969 रोजी जुमडा, हिंगोली येथे झाला. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी भारतीय
सैन्यात प्रवेश करून 22 वर्षे देशसेवा केली आणि शौर्य व शिस्तीचा आदर्श घालून दिला. 2010 मध्ये सेवानिवृत्तीनंतर
त्यांनी कल्याणी फोर्जमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत कामगार कल्याणासाठी महत्त्वपूर्ण सुधारणा
घडवून आणल्या.
2013 मध्ये महिला व बाल विकास विभागात प्रोबेशन ऑफिसर म्हणून रुजू होऊन भिक्षक गृह, महिलांचे पुनर्वसन
आणि पं. नेहरू बाल सुधारगृहातील मुलांच्या सुधारणेसाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. वाशीम जिल्ह्यात सुपरिटेंडेंट
पदावर त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांसाठी गव्हर्नन्स कार्यशाळा, धार्मिक उपक्रम, प्रेरणादायी चित्रपट, स्टेशनरी वाटप
अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले.
त्यांच्या प्रामाणिक आणि निःस्वार्थी कार्यासाठी त्यांना समाजभूषण पुरस्कार मिळाला आहे. सैनिक, प्रशासक आणि
समाजसेवक म्हणून त्यांनी दिलेले योगदान भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन दैनिक महा मेट्रो तर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले.