
चटकदार मिसळ अन् खमंग चर्चा! सुधीर वाघमोडेंचा ‘मिसळ पे चर्चा’
‘मिसळ पे चर्चा’तून जाणून घेतल्या प्रभागातील समस्या; नागरिक, महिला, मुले झाले सहभागी.
येरवडा : येरवडा परिसरातील प्रभाग क्रमांक दोन, नागपूरचाळ-फुलेनगर प्रभागातून ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार सुधीर वाघमोडे यांनी रविवारी एक आगळावेगळा उपक्रम राबवला. येरवडा पोस्ट ऑफिसजवळील ‘सैराट मिसळ’ या हॉटेलवर त्यांनी नागरिकांसाठी ‘मिसळ पे चर्चा’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. वाघमोडे यांच्या या अनोख्या कल्पनेस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला.
विकास आणि समस्यांवर चर्चा:
प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि प्रभागाच्या विकासकामांची दिशा ठरवण्यासाठी वाघमोडे यांनी नागरिकांना मिसळ खाण्याचा आनंद घेत चर्चा करण्याचे एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. या चर्चेत पुरुष, महिला आणि मुलांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. नागरिकांनी सुधीर वाघमोडे यांच्यासोबत मनमोकळेपणाने प्रश्न विचारून आणि समस्या मांडून चर्चा केली.
चर्चेतील प्रमुख मुद्दे:
आरोग्य आणि सुरक्षा: नागरिकांचे आरोग्य, महिला व लहान मुलांची सुरक्षा याबद्दल खास करून चर्चा झाली.
रस्ते आणि स्वच्छता: प्रभागातील रस्त्यांची दुरवस्था हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आला. काही नागरिकांनी रस्त्यावर उघड्यावर कचरा टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार केली आणि त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. रोजगार आणि मैदाने: अनेक तरुण बेरोजगार असून त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत तरुणांनी चर्चा केली. तर लहान मुलांनी त्यांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
ज्येष्ठ नागरिकांची मागणी: ज्येष्ठ नागरिकांनी प्रभागातील गार्डनची वेळ वाढवून मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सकाळच्या प्रसन्न वातावरणात, चटकदार मिसळीचा आस्वाद घेत नागरिकांनी प्रभागाच्या विकासावर खमंग चर्चा केली. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल हजारो लोकांनी प्रतिसाद देऊन सुधीर वाघमोडे यांचे आभार मानले.