चोरट्यांकडून दोन रिक्षा व एक दुचाकी जप्त

Dilip KurhadePuneCrime17/05/2025123 Views

चोरट्यांकडून दोन रिक्षा व एक दुचाकी जप्त
भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी
पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी एका आरोपीकडून दोन रिक्षा व एक दुचाकी हस्तगत केले. या प्रकरणी पोलिसांनी माजिद युनूस अन्सारी (वय २२,रा. सय्यदनगर हडपसर) याला अटक केले आहे.
याबाबतची माहिती अशी कि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे अधिकारी पोलीस निरीक्षक निलेश मोकाशी व पोलिस अंमलदार यांना वाहन चोरांचा शोध घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास पथकातील पोलीस आमदार तुकाराम सुतार , संदीप आगळे, मंगेश पवार , महेश बारावकर हे वाहन चोरांचा शोध घेत होते. त्यावेळी त्यांना आरोपी माजिद युनूस अन्सारी हा मिळून आला. याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील हद्दीतून रिक्षा व दुचाकी चोरून त्या कात्रज कोंढव रोडवरील पेरूच्या बागेत लपून ठेवल्याची बातमी मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तीन रिक्षा व एक दुचाकी गाडी जप्त केली. सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीणकुमार पाटील , पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील , सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक गुन्हे राहुलकुमार खिलारे , पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश पवार, महेश बारवकर, सचिन सरपाले , सागर बोरगे, नितेश चौरमले, अभिनय चौधरी, किरण साबळे, निलेश खेरमोडे यांच्या पथकाने केली आहे .

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...