डिजिटल अरेस्टची धमकी देऊन सहा कोटी २९ लाख रुपयाला फसवणार निघाला बांधकाम व्यावसायिक

Dilip KurhadeCrimeCityPune01/06/2025519 Views

डिजिटल अरेस्टची धमकी देऊन सहा कोटी २९ लाख रुपयाला फसवणार निघाला बांधकाम व्यावसायिक
सायबर पोलीसानी आरोपीला पनवेल येथून घेतले ताब्यात ; लुबाडले रुपये एफडी केल्यामुळे पोलीसांच्या जाळ्यात

पुणे : पुणे शहरात गेल्या वर्षी एक ज्येष्ठ नागरिकांची तब्बल सहा कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. आरोपीने व्हाट्सअप च्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकास डिजिटल अरेस्टची धमकी दिली होती . पैसे मिळताच त्याने त्याच बँकेत ९० लाख व वीस लाख रुपये एफडी केली होती. त्यामुळे पोलीसना आरोपीचा माग काढणे सोपे झाले. सुरवातीला त्याने पोलीसांना गुंगारा दिला. मात्र पुणे सायबर पोलीसानी अखेर त्याला पनवेल येथील एक रिसॉट मधून सापळा रचून अटक केले.

गेल्या वर्षी पुण्यातील एका जेष्ठ नागरिकाला नऊ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान अनोळखी व्हाट्सअप करून पोलीस असल्याची बतावणी केली. फिर्यादीचे विरोधात मनी लॉन्ड्री च सांगून चौकशी करण्याच्या डिजिटल अरेस्ट करणार असल्याचे सांगितले. फौजदारी कट रचून लबाडीने फिर्यादीला पैसे पाठवण्यास भाग पाडले . फिर्यादीची एकूण सहा कोटी २९ लाख रुपये रकमेची आर्थिक फसवणूक केली असल्याचे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपीने पुण्यातील फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांवर घेतले असल्याचे तपासात आढळले. ११ नोव्हेंबर २०२४ रोजी वीस लाख रुपये फिर्यादी यांचे खात्यातून आरोपीचे बँक खात्यात वर्ग झाल्याचे व त्यानंतर आरोपीने त्याच बँकेत ९० लाख व वीस लाख रुपये रकमेची एफडी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. हे बँक खाते हे एका बांधकाम व्यासायिकच्या नावे होते. आरोपीचा पत्ता मु. पोस्ट . कोकवन , तालुका रोहा , जिल्हा रायगड येथील असल्याची व तो बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती प्राप्त झाली. तेव्हा सायबर पोलिसांचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सदर बँक खात्याचे खातेधारक तुषार हरिश्चंद्र वाजंत्री व त्याचा साथीदार यांच्या असल्याची माहिती मिळाली . पोलीस आरोपी यांचा शोध घेण्याकरता मुक्काम पोस्ट कोकवन परिसरामध्ये शोध घेतला परंतु पोलीस त्याच्या मागावर असल्याची त्याला चाहूल लागल्याने तो पळून गेला. त्यानंतर आरोपी तुषार हरिश्चंद्र वाजंत्री हा पनवेल परिसरामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता आरोपीला पनवेल येथील मोरवे गावातील ऐश्वर्या रिसॉर्ट परिसरातून सापळा सीताफिने पकडले.
दाखल गुन्ह्यात आरोपी तुषार वाजंत्री याला अटक करून न्यायालयात हजर केले असता. त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे आतापर्यंत झालेल्या तपासात आरोपीचे विरुद्ध वेगवेगळ्या राज्यात नॅशनल सायबर पोर्टलवर एकूण पाच तक्रारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीचा साथीदार फरार असून त्याचा सायबर पोलीस ठाणे कसोशीने शोध घेत आहे. आरोपींचा केरळ पोलीस देखील शोध घेत आहे. केरळ पोलीस व सायबर पोलीस ठाणे पुणे शहर एकमेकांच्या संपर्क आहेत.
ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा , अप्पर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर विवेक मासाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन स्वप्नाली शिंदे, पोलीस अंमलदार राजुदास चव्हाण, मुंडे , कोंडे, बाळासाहेब चव्हाण, जानवी बडेकर, संदीप पवार, संदीप यादव , सचिन शिंदे , सचिन मांढरे यांनी ही कामगिरी केली .

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...