
डेक्कन कॅालेजला न मिळालेल्या टीडीआर ची विक्री विश्वस्तांनी थांबविली
५३ कोटी रुपये किंमतीच्या जागेची पाच कोटी रूपयांत केली होती विक्री ; तत्कालीन कुलगुरू प्रमोद कुमार पांडे व रजिस्टार अनिता सोनवणे यांचा उद्योग
पुणे ः डेक्कन कॅालजेच्या तत्कालीन कुलगुरू आणि रजिस्टार यांनी चक्क पुणे महापालिकेकडून न मिळालेल्या २२ हजार ७१० चौरस मिटर टीडीआर ( विकास हस्तांतरण हक्क) परस्पर एका बांधकाम व्यवसायिकाला विकले होते . या टीडीआर चे बाजारमूल्य ५३ कोटी रूपये असताना त्याची कवडीमोल किंमतीत अर्थात पाच कोटी रुपयांनी विक्रीकेली होती. विशेष म्हणजे सहधर्मदाय आयुक्त रजनी क्षीरसागर व डेक्कन कॅालेजच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी यांना या बाबत पूर्णता अंधारात ठेवले होते. मात्र डेक्कन कॅालेजच्या विश्वस्तांनी या विक्रीला स्थगिती दिली आहे.
डेक्कन कॅालेजचे तत्कालीन कुलगुरू प्रमोदकुमार पांडे व रजिस्टार अनिता सोनवणे यांनी थंड डोक्याने पुणे महापालिकेकडून अद्याप न मिळालेल्या २२ हजार ७१० चौरस मिटर टीडीआर चक्क पाच कोटी रूपयांत विक्री केली होती . ज्याची किंमत आज बाजारमुल्याप्रमाणे तब्बल ५३ कोटी रूपये आहे. त्यामुळे या गैरव्यवहारात काही तरी काळेबेरे असल्याची दाट शक्यता होतो . दरम्यान टीडीआर विक्री केल्याच्या चार महिन्यानंतर विद्यमान कुलगुरू प्रसाद जोशी यांनी जसे काहीच झाले नसल्याचा आव आणला होता. धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागर यांच्या कार्यालया मार्फत डेक्कनकॅालेज प्रशासनाला टीडीआर संबंधित तक्रारी येऊ नये म्हणून वृत्तपत्रात जाहिर नोटीस देण्यास भाग पाडले. टीडीआर विक्री झाल्याचे त्यांनी सहधर्मादाय आयुक्त कार्यालयाला कळविले नाही. तर २८ जानेवारीचा २०२५ रोजी विश्वस्त बैठकित विश्वस्तांसह डेक्कन कॅालेजचे विश्वस्त अध्यक्ष तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी यांना सुद्धा टीडीआरची विक्री झाल्याचे सांगितले नाही. याचा अर्थ त्यांचा या गैरव्यवहारात अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे उघड असल्याची चर्चा होती.
डेक्कन कॅालेजच्या टीडीआर ची पाश्वभुमी
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वेळी पुणे महानगरपालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी डेक्कन कॅालेजची २२ हजार ७१० चौरस मिटर जागा घेतली होती. त्या बदल्यात महापालिकेने डेक्कन कॅालेजला तेवढ्याच जागेचा २२ हजार ७१० चौरस मीटरचा टीडीआर ( विकास हस्तांतरण हक्क) दिला. कॅालेजच्या विश्वस्तांचा ठराव व धर्मादाय आयुक्त कार्यालयाने त्या जागेच्या २०२०-२०२१ या वर्षात टीडीआरचा लिलाव केला. यामध्ये पुष्पा प्रॅापर्टी व कुणाल बिल्डरने तब्बल पाच कोटी ३३ लाख रूपये मोजून ११ हजार २७५ चौरस मिटर टीडीआर विकत घेतला. त्यानंतर उर्वरित ११ हजार २७५ चौरस मिटर जागेचा टीडीआर विकत घेण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने संबंधित बिल्डरला सहा महिन्यांची मुदत दिली. दरम्यान मुदत उलटून गेल्याने हा व्यवहार रद्द झाला. तर उर्वरित ११ हजार २७५ चौरस मिटर जागेचा महापालिकेने दुप्पट टीडीआर केला. तर आजच्या बाजार भावाप्रमाणे व रेडीरेकनर प्रमाणे २२ हजार ७१० चौरस मिटरच्या टीडीआर ची किंमत तब्बल ५३ कोटी रुपये झाली.
या टीडीआरची विक्री करायची झाल्यास डेक्कनकॅालेजच्या विश्वस्तांचा ठराव करणे , त्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी या टीडीआर चा लिलाव करणे क्रमप्राप्त आहे. यासाठी महापालिकेची डेक्कन कॅालेजला टीडीआर देणे आवश्यक होते. मात्र या सर्व नियम गुंडाळून डेक्कनकॅालजच्या तत्कालीन कुलगुरू प्रमोदकुमार पांडे यांनी परस्पर रजिस्टारला हाताशी धरून टीडीआर विक्रीचा घाट घातला . त्यासाठी आगाऊ ( ॲडव्हास) रक्कम म्हणून ३३ लाख रूपयांचा धनादेश डेक्कन कॅालेजच्या बॅंक खात्यामध्ये वटवला आहे. त्यामुळे या व्यवहाराची चर्चा रंगली आहे. याबाबत विश्वस्तांना अंधारात ठेवले आहे. डेक्कन कॅालेज संस्थेचे आर्किटेक्ट यांना या गंभीर टीडीआर घोटाळ्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयात व संस्थेचे अध्यक्ष तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी यांनी इ मेल ने पाठिवली होती दरम्यान डेक्कन कॅालेजच्या विश्वस्तांनी ठराव करून विक्रीला स्थगिती दिली आहे.
टीडीआर घोटाळ्यात एक मोठे बांधकाम व्यावसायिक
डेक्कन कॅालेजच्या टीडीआर घोटाळ्यात एक मोठे बांधकाम व्यवसायिक असल्याची चर्चा आहे. पुष्पा प्रॅापर्टीज ही बोगस कंपनी दाखवून टीडीआर लाटणारे भलतेच असल्याची चर्चा पुणे महापालिका वर्तुळात आहे. त्यामुळे टीडीआर घोटाळा करणारे, त्याची विक्री करणारे ते खरेदी करणारे , त्यांना मदत करणा-यांचे एक मोठे रॅकेट असल्याचाही चर्चा आहे.