डेक्कन कॅालेज पुरातत्व वस्तूंची रिप्लिका ( प्रतिकृती) तयार करून विक्री करणार 

Dilip KurhadeNational11/05/2025135 Views

सौजन्य चॅट जीपीटी प्रातिनिधिक चित्र

डेक्कन कॅालेज पुरातत्व वस्तूंची रिप्लिका ( प्रतिकृती) तयार करून विक्री करणार 

सिंधू संस्कृति व देशभरातील उत्खननात सापडलेल्या वस्तू घर व कार्यालयांच्या इंटिरियर मध्ये स्थान  मिळविणार 
येरवडाः सिंधु संस्कृतीची उदय  हडप्पा व मोहेजदडो या शहरातून झाली. हे शहर स्थापत्यशास्त्राचा एक सुंदर नमुना होता. या शहराच्या उत्खननात अनेक प्राचिन वस्तू पुरातत्व विभागाला सापडल्या. यामध्ये मुर्त्या,  माणिक व मोतीचे दागिने, भांडी, खेळणी , टेराकोटाच्या मुर्त्यांचा समावेश होता. अशा अनेक वस्तू डेक्कन कॅालेजच्या पुरातत्व संग्रहालयात आहेत. यासह महाराष्ट्रातील व देशभरात विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात शेकडो वस्तू सापडल्या आहेत. या वस्तूंचे पुरातत्वदृष्ट्या अधिक महत्व आहे. पण या वस्तूंच्या प्रतिकृती ( रिप्लिका) जर तयार केल्या तर त्याला मागणी मोठी असेल व त्यातून उत्पन्न सुद्धा मिळू शकते. त्यामुळे डेक्का कॅालेज पुरातत्व वस्तूंच्या प्रतिकृती तयार करण्याच्या विचारात आहे.
ग्रामिण असो वा शहर प्रत्येकाला घरात किंवा कार्यालयात शोभेच्या वस्तू ठेवण्यावर भर असतो. त्यात जर का वस्तू ही पुरातत्व काळातील असेल तर अशा वस्तू दर्शनी भागात ठेवण्यावर अनेकांचा भर असतो. आता तर कार्पोरेट युगात हस्तचित्र, पेटिंग, पोर्टरेट आणि रिप्लिंकाना अधिक महत्व दिले जाते. जगभरात या वस्तूंना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे डेक्कन कॅालेज पुरातत्व विभाग त्यांच्याकडे असलेल्या शेकडो वस्तूंच्या प्रतिकृती ( रिप्लिका) तयार  करणार आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना या वस्तूंच्या निर्मिती बरोबरच रिप्लिकांचे उत्पादन होणार आहे. यासह इतर लघु उद्योजकांना या वस्तूंच्या उत्पादनाची संधी मिळणार आहे.
रिप्लिकांची ॲानलाईन विक्रीला मोठा प्रतिसाद आहे.
देशभरात ग्रीक पॅाटरी, कॅाईन्स, मूर्त्या, ब्रॅाझच्या मृर्त्या, टेराकोटाच्या मुर्त्या, माणिक व मोतीचे दागिने अशा अनेक वस्तूंच्या प्रतिकृतींचा ( रिप्लिका) यात समावेश आहे. या वस्तू एक हजारापासून ते लाखो रूपयांपर्यंत त्यांच्या किंमती आहेत.

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...