डेक्कन कॉलेजचे नवीन पुरातत्त्व संग्रहालयाचे काम रखडले 

Dilip KurhadeCulturalEducation01/05/2025104 Views

डेक्कन कॉलेजचे नवीन पुरातत्त्व संग्रहालयाचे काम रखडले 
येरवडाः केंद्र सरकारने डेक्कन कॉलेजला सहा कोटी रूपयांचे अुनदान दिले आहे.केंद्र सरकारच्या अटीप्रमाणे राज्य सरकारने वीस टक्के रकम देणे बंधनकारक आहे. मात्र राज्य सरकारने ही रकम न दिल्याने कॉलेजचे नवीन पुरातत्त्व संग्रहालयाचे काम रखडले.
देशातील  तीसऱ्या क्रमाकांची शैक्षणिक संस्था अर्थात डेक्कन कॉलेजने नुकतेच व्दिशताब्दी वर्ष साजर् केले आहे.  संस्थेला ना केंद्र ना राज्य सरकारची मदत मिळते. येथील अनेक पदे भरली गेली नाहीत. तर दुसऱ्या बाजुला नवीन पुरातत्त्व संग्रहालयाच्या अंतर्गत बांधकामासाठी ‘आऊट सोर्स’ करण्याची वेळ संस्थेला आली आहे. या संदर्भात डेक्कन कॉलेजचे कुलगुरू मनोज पांडे म्हणाले, ‘‘ केंद्र सरकारने डेक्कन कॉलेजला सहा कोटी रूपयांचे अनुदान दिले आहे. त्यासाठी त्यांनी राज्य सरकारने वीस टक्के ( १ कोटी २० लाख रूपये) अनुदान देण्याचे बंधनकारक केले आहे. मात्र राज्य सरकारने ही रकम अद्याप न दिल्याने केंद्र सरकारने रकम दिली नाही. त्यामुळे अनेक विकासकामे खोळंबली आहेत. नवीन पुरातत्त्व संग्रहालयाचे काम बाकी आहे.
नवीन पुरातत्त्व संग्रहालयाचे वैशिष्टये डेक्कन कॉलेजच्या नवीन पुरातत्त्व संग्रहालयात भारतीय संस्कृतीचा पाषाणयुगापासून ते मराठा कालखंडापर्यंतच्या दालनांची मांडणी करण्यात येणार आहे. भारतीय संस्कृतीच्या हजारो वर्षांच्या इतिहासाची मांडणी केली जाणार आहे. पाषाण युग, ताम्र पाषाण युग, सिंधू संस्कृती, विविध कालखंडातील नाणी, शिल्पांमधील वैविध्य, मध्ययुगीन कालखंड, मराठ्यांचा काळ अशी दालने असणार आहेत. या दालनांमध्ये विविध कालखंडातील उत्खननात मिळालेल्या वस्तू व त्याची माहिती प्रदर्शित केली जाणार आहे.
           संस्कृत विश्वकोशाची निर्मिती
डेक्कन कॅालजमध्ये १९३८ पासुन संस्कृत विश्वकोशाची निर्मिती होत आहे. हा विश्वकोष एवढा मोठा आहे कि अजुन शंभर ते सव्वाशे वर्ष त्यावर काम केले जाणार आहे. स्क्रिप्टोरिअम अर्थात एका संस्कृत शब्दाचे समान अर्थी शब्द अनेक आहे. अशा शब्दांचे संकलन डेक्कन कॅालेजच्या संस्कृत विभागात होत

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...