डॉल्बी सिनेमाचे भारतात पदार्पण, पुण्यातील सिटी प्राइड येथे पहिल्या स्क्रिनचे उद्घाटन
पुणे – डॉल्बी लॅबोरेटरीज, इन्क. (एनवायएसई: डीएलबी) या सर्वोत्तम मनोरंजन अनुभव देणाऱ्या जागतिक अग्रणी कंपनीने आज सिटी प्राइड, खराडी, पुणे येथे भारतातील पहिले डॉल्बी सिनेमा®️लाँच करत ऐतिहासिक क्षण रचला.
हे अत्याधुनिक ऑडिटोरियम ३१०-आसनी डॉल्बी सिनेमा आहे, जे प्रीमियम चित्रपट पाहण्याचा अनुभव देण्यासाठी उद्देशसहित डिझाइन करण्यात आले आहे, ज्यामध्ये डॉल्बी व्हिजन®️ चे उल्लेखनीय व्हिज्युअल्स आणि डॉल्बी अॅटमॉस®️ च्या सर्वोत्तम साऊंडचे संयोजन आहे. फक्त डॉल्बी सिनेमाकडे डॉल्बी व्हिजन ड्युअल ४के लेझर प्रोजेक्शन सिस्टमचा दोन्ही दर्जा आहे, जी ब्राइटनेस, सुस्पष्टता व तपशील वाढवण्यासह स्टुडिओ ग्रेड डॉल्बी अॅटमॉस आणि प्रेरणादायी डॉल्बी सिनेमा डिझाइन देते, ज्यामधून सिनेमागृहामधील प्रत्येक आसनावर वास्तविक अनुभव मिळतो. २डी व ३डी चित्रपटांची पिक्चर क्वॉलिटी व तपशील वास्तविक आहेत, ज्यामुळे सीनमधील दृश्य प्रत्यक्ष घडत आहे असे वाटते.
या लाँचसह पुणे प्रेक्षकांना हा उच्च स्तरीय सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी भारतातील पहिले शहर बनले आहे, ज्याची सुरूवात ४ जुलै रोजी डॉल्बी व्हिजन व डॉल्बी अॅटमॉसमध्ये ‘जुरासिक वर्ल्ड रिबर्थ’च्या रीलीजसह होत आहे. डॉल्बी सिनेमा अद्वितीय व परिवर्तनात्मक अनुभव देतो, जेथे तुम्ही कथानकाशी कनेक्ट होऊ शकता. तुम्हाला चित्रपटनिर्मात्यांनी तुमच्यासाठी निर्माण केलेल्या पात्रांच्या जीवनामध्ये आणि विश्वामध्ये सामावून गेल्यासारखे वाटेल. डॉल्बी सिनेमा चित्रपट पाहण्याच्या अनुभवाला अद्वितीय व प्रेरक डिझाइन असलेल्या इव्हेण्टमध्ये बदलण्यासाठी देखील डिझाइन करण्यात आले आहे. डॉल्बी सिनेमामध्ये तुम्हाला डायनॅमिक लायटिंग, अबाधित साइड लाइन्स असलेल्या प्रीमियम सीट्स, व्यत्यय कमी करण्यासाठी काळजीपूर्वक डिझाइन करण्यात आलेली रूम आणि वक्राकार वॉल-टू-वॉल-टू-सिलिंग स्क्रिन्सचा अनुभव मिळेल. डिझाइनचाप्रत्येक पैलू एकत्रितपणे सर्वोत्तम, प्रबळ व संस्मरणीय अनुभव देतो.
डॉल्बी लॅबोरेटरीजच्या वर्ल्डवाइड सिनेमा सेल्स अँड पार्टनर मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष मायकल आर्चर म्हणाले, “पुण्यामध्ये डॉल्बी सिनेमाचे लाँचभारतासाठी आमच्या दीर्घकालीन दृष्टिकोनामधील महत्वपूर्ण पाऊल आहे. भारतात १००० हून अधिक डॉल्बी अॅटमॉस स्क्रिन्ससह आता डॉल्बी सिनेमा भारतातील प्रीमियम सिनेमॅटिक मनोरंजनामध्ये नवीन मापदंड स्थापित करेल. आम्ही काळजीपूर्वक संपूर्ण सिनेमॅटिक अनुभव डिझाइन केला आहे. रिव्हर्स होणाऱ्या, एैसपैस आसन व्यवस्थेपासून सुस्पष्ट साइट लाइन्सपर्यंत तुम्हाला आकर्षक इंटीरिअर लायटिंग व प्रीमियमतेसह अद्वितीय चित्रपट पाहण्याचा अनुभव मिळेल. आम्ही आघाडीचे चित्रपटनिर्माते, स्टुडिओ व प्रदर्शकांसोबत सहयोग करत असताना अधिकाधिक थिएटर्स लाँचकरण्यास उत्सुक आहोत, जे भारतातील प्रेक्षकांना जागतिक दर्जाचा चित्रपट पाहण्याचा अनुभव देतील.”
“चाफळकर कुटुंबाचा चित्रपटसृष्टीमधील प्रवास आमच्या पहिल्या सिनेमासह १९३९ मध्ये सुरू झाला. एका स्क्रिनवरून आज महाराष्ट्रात ४० स्क्रिन्सपर्यंतचा प्रवास अविश्वसनीय राहिला आहे,” असे सिटी प्राइड मल्टीप्लेक्सेसचे सहयोगी पुष्कराज चाफळकर म्हणाले. “आम्हाला डॉल्बी अॅटमॉस स्क्रिन्सवरून सिटी प्राइड खराडी येथे भारतातील पहिला डॉल्बी सिनेमा लाँच करण्यापर्यंत डॉल्बीसोबतचा आमचा सहयोग विस्तारित करण्याचा अभिमान वाटतो. पुणेकरांची प्रीमियम मनोरंजनासाठी आवड डॉल्बी सिनेमाला या अनुभवाकरिता अनुकूल बनवते. या लाँचमधून प्रेक्षकांना अत्याधुनिक सिनेमाचे मनोरंजन देण्याप्रती आमची सातत्यपूर्ण कटिबद्धता दिसून येते.”
डॉल्बी सिनेमा प्रत्येक चित्रपटामधील भावनिक प्रभावाला समोर आणतो, ज्यामुळे तुम्हाला डॉल्बी व्हिजनची सुस्पष्टता व वैविध्यपूर्ण कलर्सचा अनुभव मिळतो, तसेच विशेष डिझाइन केलेल्या सिनेमा वातावरणामध्ये डॉल्बी अॅटमॉसच्या सर्वोत्तम साऊंडचा आनंद मिळतो. हे अद्वितीय संयोजन इतके वास्तविक आहे की, तुम्ही चित्रपट पाहत आहात हे विसरून जाल. थ्रिलर, काल्पनिक किंवा ड्रामा पाहण्याचे मनोरंजन घेत असलात तरी डॉल्बी सिनेमा प्रत्येक सीनला अधिक वास्तविक व शक्तिशाली बनवतो. डॉल्बी व्हिजनच्या कॉन्ट्रास्ट्स व आकर्षक कलर्सपासून डॉल्बी अॅटमॉसच्या वास्तविक ऑडिओपर्यंत प्रत्येक तपशील एकत्र येत प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथानकामध्ये सामावून जाण्यास भाग पाडतो.
या अनुभवाला अधिक उत्साहपूर्ण करत आहे डॉल्बीची प्रबळ कन्टेन्ट श्रेणी, जेथे जागतिक स्तरावर आतापर्यंत डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी अॅटमॉसमध्ये ७४० हून अधिक चित्रपट प्रदर्शित झाल्याची किंवा प्रदर्शित होण्याची पुष्टी मिळाली आहे.
या लाँचसह सिटी प्राइड डॉल्बी सिनेमा प्रदर्शकांच्या प्रतिष्ठित जागतिक नेटवर्कमध्ये सामील झाला आहे. भारतात सुरू करण्यात येणाऱ्या सहा डॉल्बी सिनेमा स्क्रिन्सपैकी ही पहिली स्क्रिन आहे. इतर गंतव्यं आहेत हैदराबाद, बेंगळुरू, त्रिची, कोची व उलीक्कल.
सिटी प्राइड, खराडी, पुणे येथे डॉल्बी सिनेमा ४ जुलै २०२५ पासून जनतेसाठी खुला झाला आहे. तिकिटे बुकमायशोवर उपलब्ध आहेत आणि चित्रपट प्रेमी येत्या दिवसांमध्ये विशेष ऑफर्स व विशेष प्रीव्ह्यूचा लाभ घेऊ शकतात.