दत्ता पांडू श्रीखंडे, (बी.ए. एम.ए.) व्यसनमुक्तीचे प्रेरणादायी उदाहरण

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंदिर ( येरवडा) ः दत्ता श्रीखंडे यांना मानपत्र देताना दीपक सावंत ( डावीकडून) दत्ता श्रीखंडे , दीपक सावंत

आदरणीय श्री. दत्ता पांडू श्रीखंडे, (बी.ए. एम.ए.)
व्यसनमुक्तीचे प्रेरणादायी उदाहरण

श्री. दत्ता पांडू श्रीखंडे, मानसशास्त्रात बी.ए. आणि मराठी साहित्यात एम.ए. पदवी प्राप्त असलेले श्री. दत्ता पांडू श्रीखंडे हे
गेली ३३ वर्षे व्यसनमुक्त जीवन जगत असून, पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात काउन्सलर व कोऑर्डिनेटर

म्हणून कार्यरत आहेत.

मल्टी-ड्रग अ‍ॅडिक्शनमधून स्वतःची मुक्तता करून त्यांनी व्यसनमुक्ती क्षेत्रात पथनाट्य, टीव्ही शो, व्याख्याने आणि
विविध माध्यमांतून शाळा, महाविद्यालये तसेच इतर ठिकाणी व्यापक जनजागृती केली आहे. त्यांच्या कार्याची दखल
घेऊन महाराष्ट्र शासनाचा “महात्मा गांधी सेवा पुरस्कार” त्यांना मा. नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांच्या जीवनातील परिवर्तनाचा विशेष उल्लेख केला आहे.

वयाच्या पन्नाशीनंतर त्यांनी बॉडीबिल्डिंग क्षेत्रातही उल्लेखनीय यश संपादन करून पुणे श्री, महाराष्ट्र श्री व भारत श्री या
स्पर्धांत सहभाग नोंदवला आहे. सोनी टीव्हीने त्यांच्या जीवनावर विशेष कार्यक्रम सादर केला असून, स्टार प्लसवरील
‘मास्टर शेफ इंडिया – सीझन ३’ मध्ये ते अंतिम २५ स्पर्धकांमध्ये निवडले गेले होते. आजही ते व्यसनमुक्तीच्या कार्यात
तितक्याच जोमाने कार्यरत आहेत.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन दैनिक महा मेट्रो तर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...