पर्यावरणासाठी वरदान ठरणाऱ्या वज्र या सॉफ्टवेअरचे पुण्यात दिमाखदार उद्घाटन*

Dilip KurhadePuneBusiness10/05/2025129 Views

वज्र चे उद्घाटन निरंतरा चे संस्थापक अध्यक्ष प्रसन्न राव ,पर्यावरण तज्ञ संगीता मन्सूर,सुझलॉन च्या निशिता गुप्ता,प्पर्यावरणाच्या अभ्यासिका अदिती मिश्रा,कोलगेट पामोलिव च्या शिल्पश्री मुन्निस्वामुप्पा,यांच्या हस्ते पार पडले.

पर्यावरणासाठी वरदान ठरणाऱ्या वज्र या सॉफ्टवेअरचे पुण्यात दिमाखदार उद्घाटन*
— पुण्यातील निरंतरा संस्थेने केली पर्यावरणासाठी वज्र ची निर्मिती —-

पुणे : पर्यावरनादाठी महत्वपूर्ण आणि वरदान ठरणाऱ्या वज्र ची निर्मिती पुण्यातील निरंतरा या संस्थेने केली असून त्याचे उद्घाटन पुणे आज पुण्यात पार पडले . निरंतरा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रसन्न राव यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ झाला.देशातील विविध संस्था आणि कंपन्यांना वज्र ची मोलाची मदत होणार आहे. असा विश्वास राव यांनी यावेळी व्यक्त केला .
सध्या पर्यावरण हा जागतिक प्रश्न निर्माण झाला आहे .त्या पार्शवभूमीवर वज्र ची निर्मिती महत्वाचा टप्पा ठरणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगितले जात आहे . वज्र मुळे पर्यावरणाचे नियोजन करणे अधिक सुलभ होणार आहे .जसे की पाण्याचा वापर,कंपन्यांचे उत्सर्जित घटक, कार्बन,हवा ,वीज व इतर सर्व घटक ज्यांचा पर्यावरणाशी संबंध येतो त्या सर्व घटकांचे सुव्यवस्थित नियोजन वज्र हे सॉफ्टवेयर करणार आहे .म्हणजेच पर्यावरणीय, सामाजिक आणि शासनतत्त्वे (Environmental, Social आणि Governance )हे तीन महत्त्वाचे घटक, जे एखाद्या संस्थेच्या शाश्वततेचा आणि जबाबदार व्यवसाय पद्धतींचा आढावा घेतात. पर्यावरणीय घटकांतून कंपनीचा निसर्गावर होणारा परिणाम जसा की कार्बन उत्सर्जन, ऊर्जा वापर व अपशिष्ट व्यवस्थापन यांचा विचार केला जातो. सामाजिक घटकांमध्ये कामगारांचे कल्याण, विविधता, सुरक्षितता, आणि स्थानिक समुदायांसाठी योगदान यांचा समावेश होतो. तर शासनप्रणालीत कंपनीच्या धोरणात्मक निर्णयांमधील पारदर्शकता, नैतिकता, आणि जोखीम व्यवस्थापन यावर भर दिला जातो. ESG तत्त्वांचे पालन केल्याने कंपन्यांना त्यांच्या व्यवसायात दीर्घकालीन टिकाव, गुंतवणूकदारांचा विश्वास, आणि सामाजिक मान्यता मिळवण्यास मदत होते.त्यामुळे वज्रमुळे पर्यावरणसाठी अतिशय मोलाची मदत होणार असे यावेळी सांगण्यात आले .

वज्र चे उद्घाटन निरंतरा चे संस्थापक अध्यक्ष प्रसन्न राव ,पर्यावरण तज्ञ संगीता मन्सूर,सुझलॉन च्या निशिता गुप्ता,प्पर्यावरणाच्या अभ्यासिका अदिती मिश्रा,कोलगेट पामोलिव च्या शिल्पश्री मुन्निस्वामुप्पा यांच्या हस्ते पार पडले.यावेळी निरंतरा चे संस्थापक प्रसन्न राव ,संस्थेचे कार्यकारी संचालक कॅप्टन विनोद नायर,नीता जोशी ,डॉ.राम कोनाळे ,डॉ.निलेश पाटील आदि उपस्थित होते .

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...