पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘निर्जली’ ठरला सर्वोत्तम चित्रपट तर लघुपटात ‘थुनाई’ ने मारली बाजी

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निर्जलीठरला सर्वोत्तम चित्रपट तर लघुपटात थुनाईने मारली बाजी

 

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शानदार पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न

 

पिंपरी : पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निर्जलीया आशयसंपन्न चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावत महोत्सवाच्या केंद्रस्थानी स्थान मिळवले, तमिळ भाषेतील थुनाईया लघुपटाने साऱ्यांची मने जिंकून सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार आपल्या नावे केला.  तर सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन फिल्ममध्ये लेसने बाजी मारली. या महोत्सवात भारतासह ४० देशांमधून आलेले ९० पेक्षा अधिक चित्रपट, लघुपट, माहितीपट, अॅनिमेशन आणि ६० सेकंद फिल्म्स प्रदर्शित करण्यात आले. यामध्ये  सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रियंका भेरिया आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार तुषार शिंगाडे यांना प्रदान करण्यात आला.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार वितरण समारंभ दिमाखात संपन्न झाला. आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या नेतृत्वाखाली आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पार पडलेल्या या सोहळ्यात देश-विदेशातील कलावंतांना विविध विभागांतील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. प्रत्येक चित्रपटामागची कल्पकता, सामाजिक जाणीव, दिग्दर्शन आणि तांत्रिक कसोट्या अनुभवायला प्रेक्षकांनी गर्दी केली होती.

यावेळी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ड. गोरक्ष लोखंडे, महापालिका उप आयुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक सुजय डहाके, रमेश होलबोले, अभिनेत्री राजश्री देशपांडे, मुख्यमंत्री सहाय्यक शुभम सातकर, रयत शिक्षण संस्थेमधील प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटीचे अध्यक्ष दत्ता गुंड, मुंबा फिल्म फाऊंडेशनचे अध्यक्ष जय भोसले, महोत्सव संचालक अभिषेक अवचार, व्यवस्थापकीय संचालक सायली शिंदे, महोत्सव सचिव डॉ. विश्वास शेंबेकर, ज्युरी सदस्य हेमंत अवताडे, महात्मा फुले विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विशाल मासुळकर, सोमनाथ शितोळे, विजय गुंड , प्रियांका चौधरी, माधुरी धमाले, अॅड. धम्मराज साळवे, आकाश माळी, ऐश्वर्या डोरले, इमरान शेख, राम दत्तकला, अविनाश कांबीकर, पालक कौल, श्रुती जाधव, किशोर काळे, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी ड. गोरक्ष लोखंडे म्हणाले,’पिंपरी चिंचवड शहराची सांस्कृतिक ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण करण्यात अशा प्रकारचे महोत्सव फारच उपयोगी ठरतात. असे महोत्सव आयोजित करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुढाकार घेत आहे. सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या अशा महोत्सवांचे आयोजन ही कौतुकास्पद बाब आहे. अशा महोत्सवांच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना मंच मिळून नवकलानिर्मितीला प्रोत्साहन मिळते.

उपआयुक्त पाटील म्हणाले, शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असून महापालिका असे उपक्रम राबविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील.

 

विशेष अधिकारी किरण गायकवाड म्हणाले, पिंपरी चिंचवड ही कामगारनगरी, औद्योगिकनगरी आणि संतांची नगरी म्हणून ओळखली जाते. हे शहर  कलाकार, नाटककार, साहित्यिकांच्या माध्यमातून सांस्कृतिक शहर म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जावे, हा प्रयत्न महानगरपालिका सातत्याने करत असते. या महोत्सवाच्या माध्यमातून त्याकडे वाटचाल करत असून या क्षेत्रातील जाणकारांनी या सांस्कृतिक चळवळीत सहभागी व्हावे.

 

पिंपरी चिंचवडचा हा महोत्सव आता ब्रँडहोतोय

लेखक दिग्दर्शक सुजय डहाके

 

लेखक-दिग्दर्शक सुजय डहाके यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कलाविश्वाची व्याप्ती विस्तारणारा उपक्रम आहे. आंतर राष्ट्रीयस्तरावरील सांस्कृतिक विश्वाचे भावबंध यातून जोडले जातात. नवोदित कलाकार, दिग्दर्शक, आणि रसिक प्रेक्षक यांच्यातील बंध दृढ करणारा हा महोत्सव पुढच्या वर्षी आणखी मोठा, व्यापक आणि प्रभावशाली असेल, याची खात्री आहे. या शहरात अनेक नामवंत कलाकार आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा महोत्सव आयोजनासाठी निश्चित होईल. अनेक दिग्गज कलाकारांना आमंत्रित करून हा महोत्सव अधिक उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करू, यासाठी सर्व सहकार्य करण्यास देखील तयार आहोत.

 

यावेळी महोत्सवात नामवंत ज्यूरी मार्फत निवडण्यात आलेल्या विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये व्हिडीओ सॉंग, अॅनिमेशन फिल्म, चित्रपट, लघुपट व माहितीपट व ६० सेकंड चित्रपट अशा वर्गवारीचा समावेश होता.

 आंतरराष्ट्रीय स्तरावर पिंपरी चिंचवड शहराचे नाव सुलतान या लघुपटाच्या माध्यमातून गाजवत असलेले दिग्दर्शक अविनाश कांबीकर यांचाही विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम शेळके, पौर्णिमा भोर, पलक कौल आणि श्रुती रनवरे यांनी केले. आभार डॉ विश्वास शेंबेकर यांनी मानले. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मुंबा फिल्म फाउंडेशन आणि रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी यांचे विशेष सहकार्य लाभले.

विभाग निहाय विजेत्यांची नावे

 प्रमुख विजेते:

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्जली
  • सर्वोत्कृष्ट लघुपट थुनाई
  • सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेशन फिल्म लेस
  • सर्वोत्कृष्ट माहितीपट दि लॉस्ट पॅराडाईज
  • सर्वोत्कृष्ट ६० सेकंद चित्रपट पालवी

 वैयक्तिक पुरस्कार:

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता तुषार शिंगाडे (सोंगा)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रियंका भेरिया (दि फर्स्ट फिल्म)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विघ्नेश परमशिवम (थुनाई)
  • सर्वोत्कृष्ट पटकथा निखिल शिंदे (डम्प यार्ड)
  • सर्वोत्कृष्ट ध्वनी सुकन्या भावळ (एक दिवस)
  • सर्वोत्कृष्ट छायाचित्रण ऍंथोनी एन सेक
  • सर्वोत्कृष्ट संपादन दि वोको फ्रॉम हेल

 

 विशेष पुरस्कार व नामांकने:

  • ज्यूरी पुरस्कार चित्रपट विभाग: पूवू (फुल)
  • सर्वोत्कृष्ट ज्यूरी पुरस्कार: रिबेल(प्रथम) अंकुर(द्वितीय)
  • विशेष नामांकने: दि फिशर, कॅनव्हास

 

व्हिडीओ सॉंग :

        प्रथम- मेरी बहेना

        द्वितीय- बार्बी बोना

        तृतीय- आईज

 

लघुपट

प्रथम – तुनाई

द्वितीय- दि फस्ट फिल्म

तृतीय- खिचडी भात

 

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...