पुणे तेथे ‘सायरन’ उणे !

सौजन्य चॅट जीपीटी प्रातिनिधिक चित्र

पुणे तेथे ‘सायरन’  उणे !

देशाच्या संरक्षणदृष्ट्या अतिमहत्त्वाच्या शहरात अद्याप ‘सायरन’ उभारले नाहीत

पुणे : शहरात आपत्कालीन परिस्थितीत एकाच वेळी लाखो नागरिकांना धोक्याची किंवा सुरक्षिततेसंदर्भातील सूचना देणारे एकूण ७२ सायरन होते. ते कालबाह्य झाल्यामुळे बंद आहेत. हीच अवस्था राज्यात पुण्यासह मुंबई, तारापूर, उरण, ठाणे, नाशिक या सहा शहरांतही भोंगे बंद होते. ही शहरे देशाच्या संरक्षणदृष्ट्या अतिमहत्त्वाची असल्याने केंद्र सरकारच्या धोरणानुसार येथे सायरन बसविण्यात आले होते. मात्र, देखभाल आणि दुरुस्ती अभावी हे सायरन बंद आहेत. मात्र पुणे व नाशिक वगळता मुंबई, तारापूर, उरण, ठाणे या चार शहरांत अत्याधुनिक भोंगे सुरु करण्यात आली आहेत. पुणे देशाच्या संरक्षणदृष्ट्या अतिमहत्त्वाची असून हि राजकीय व प्रशासकीय उदासीनतेमुळे पुणे तेथे ‘सायरन’  उणे म्हणण्याची वेळ आली आहे.

आपत्कालीन व्यवस्थापनाने इलेक्ट्रिक शाखेकडून नवीन सायरन बसविण्यासाठी दहा कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. मात्र, सरकारी लालफितीच्या कारभारामुळे पुण्यासह मुंबई, तारापूर, उरण, ठाणे, नाशिक या सहा शहरांत सायरन सुरू होऊ शकले नव्हते. या वर्षात नव्याने मुंबई, तारापूर, उरण, ठाणे या चार शहरांत अत्याधुनिक भोंगे सुरु करण्यात आली आहेत. मात्र पुणे शहराकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
“देशात १९७१ मध्ये भोंगे बसविले होते. नागरिकांना आपत्कालीन स्थितीत धोक्याची सूचना देण्यासाठी आणि सुरक्षित स्थळी जाण्यासाठी हे सायरन वाजविले जात असत. बीएसएनएल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयाने हे सायरन दररोज सकाळी दहा वाजता वाजविले जात. मात्र, बीएसएनएलची यंत्रणा ऑप्टिकल फायबर झाल्याने इलेक्ट्रॉनिक सायरन बंद पडले. जुन्या इमारती आणि भोंग्यांची देखभाल व दुरुस्ती अभावी हे सायरन निष्क्रिय झाले.

पुणे शहरात नागरी संरक्षण दलाने काही वर्षांपूर्वीच शहरातील ७२ सायरन बंद असून ते भंगारात गेल्याचा अहवाल दिला होता. जुन्या सायरन उपकरणे सुद्धा आता उपलब्ध नाहीत. त्यामुळे नवीन सायरन बसविण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला होता. नागरी संरक्षण दलाच्या वतीने पहिल्या टप्प्यात मुंबई येथे दहा कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार केला होता . त्याप्रमाणे मुंबई, तारापूर, उरण, ठाणे या चार शहरांत अत्याधुनिक भोंगे सुरु करण्यात आली आहेत. पुणे शहरात कधी भोंगे सुरु होणार हा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

” राज्यातील पुण्यासह मुंबई, तारापूर, उरण, ठाणे, नाशिक या सहा शहरांतील भोंगे बंद होते. यातील कोणत्या शहरातील भोंगे सुरु झालेत हि माहिती घेतल्यानंतर सांगता येईल .”
– जालिंदर सुपेकर , डेप्युटी कमांडंट-जनरल, होमगार्ड्स, मुंबई.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...