
पुणे महापालिकेचा प्रारूप प्रभाग रचना जाहीर
नदी, महामार्गांची विभागणी ; भाजपचा वरचष्मा
पुणे :महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शुक्रवारी सायंकाळी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 आराखडा सादर केला. पुणे महानगरपालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 34 लाख 81 हजार 3009 इतकी आहे यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या चार लाख 68 हजार 633 इतकी आहे. अनुसूचित जमातीची लोकसंख्या 40,687 इतकी आहे तर निवडून द्यावेच्या सदस्यांची संख्या 165 आहे . त्याप्रमाणे महापालिका निवडणूक आयोगाने एकूण 41 प्रभागाची रचना केली आहे यामध्ये 40 प्रभागात चार सदस्य संख्या तर एका प्रभागात पाच सदस्य संख्या आहे. प्रत्येक प्रभागात सरासरी मतदारसंघ 84 हजार तर पाच सदस्य प्रभागात एक लाख मतदार संख्या आहे.
पुणे महापालिकेच्या एकूण 41 प्रभागात कळस- धानोरी व सूज -बाणेर- पाषाण या दोन प्रभागात अनुसूचित जमाती मतदार संख्या जास्त असल्याने हे दोन प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव असणार आहेत. यासह कळस- धानोरी मध्ये अनुसूचित जाती मतदार 18000 पेक्षा अधिक असल्याने या ठिकाणी एक प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित असणार आहे . यासह या प्रभागात इतर मागासवर्गीयांसाठी एक सदस्य असून खुल्या गटासाठी महिला व पुरुषासाठी प्रत्येकी एक सदस्य निवडून येणार आहेत. यासह पुण महापालिकेत फुलेनगर- नागपूर चाळ , येरवडा -गांधीनगर , गोखलेनगर -वाकडेवाडी , औंध -बोपोडी , पुणे स्टेशन -जयजवाननगर , रामटेकडी- माळवाडी , काशेवाडी -डायस प्लॉट , नवी पेठ -पर्वती जनता वसाहत, हिंगणे खुर्द -सहकारनगर- पद्मावती , आंबेगाव -कात्रज, अप्पर -सुप्पर इंदिरानगर या प्रभागात अनुसूचित जातीसाठी एक सदस्य आरक्षित असणार आहेत .यासह पुणे शहराच्या उपनगरांमध्ये इतर मागासवर्गीय सदस्यांसाठी काही जागा राखीव असणार आहेत. अनुसूचित जातीसाठी 22 प्रभाग , इतर मागासवर्गीयांसाठी 34 प्रभाग आणि अनुसूचित जमातींसाठी दोन प्रभाग आरक्षित आहेत. तर इतर प्रभागात खुल्या प्रवर्गासाठी एक पुरुष आणि एक महिला असणार आहेत.
पुणे महापालिकेची ही प्रारूप प्रभाग रचना असली तरी यामध्ये काही बदल करणे शक्यता कमी आहे . असा आजपर्यंतचा इतिहास सांगतो . शहरातील प्रभाग रचनेमध्ये भारतीय जनता पक्षाचा वर्चस्व दिसून येतो . या प्रभाग रचनेमुळे प्रस्थापितांना धक्का दिल्याची दिसून येते . तर निवडणुकीमध्ये गुणवत्ता, पैसा याचा उपयोग केला तरच निवडणूक जिंकणे सोपे होणार आहेत . त्यामुळे पूर्वीच्या एक सदस्य पद्धतीत एखादा गरीब सुशिक्षित उमेदवार निवडून येणे सहज शक्य होते . मात्र मिनी विधानसभा समजणाऱ्या प्रभाग रचनेत राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार निवडून येणे सोपे होणार आहे . त्यातल्या त्यात केंद्रात , राज्यात असलेल्या सत्ताधाऱ्यांना ही निवडणूक सोपी जाण्याची शक्यता आहे . या प्रभाग रचनेमध्ये कोणाचाच हस्तक्षेप नसल्याचे सांगितले असले तरी भारतीय जनता पक्षाचा हस्तक्षेप असल्याचे दिसून येते. या प्रभागा रचनेमध्ये उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांचे सुद्धा ऐकले गेले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे वडगावशेरी मतदारसंघ व हडपसर मतदार संघ आणि इतर मतदारसंघ प्रभाग रचना तोडमोड केली आहे.
23 AUG 2025 Metro ALL