पुणे शहरात गणेशोत्सवात मोठा  बंदोबस्त

Dilip KurhadePune05/09/2025231 Views

पुणे शहरात गणेशोत्सवात मोठा  बंदोबस्त

पुणे : पुणे शहरात शुक्रवारी व शनिवारी   गणेशोत्सवाची सांगता भव्य मिरवणुकीने होणार आहे. अत्यंत मनोभावे साज-या होणा-या या लोकोत्सवाची सांगता देखील त्याच दिमाखात व भव्य स्वरुपात होत असते. भव्य स्वरुपातील मिरवणुकांमुळे पुणे शहराला यात्रेचे स्वरुप येते. सदर विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी पुणे शहरातील स्थानिक लोकांसोबतच इतर जिल्हयातील, राज्यातील प्रेक्षक, पत्रकार, विविध संघटनेचे स्वयंसेवक मोठया प्रमाणात गर्दी करीत असतात. यावर्षी या कालावधीत मानाचे व महत्वाचे गणपती सोबतच एकूण ३९५९ गणेश मंडळांचे गणपतीचे विसर्जन होणार आहे. मुख्य मिरवणुकीचा मार्ग शहरातील विविध भागातुन सुरु होऊन खंडूजीबाबा चौक, नटेश्वर घाट याठिकाणी येऊन संपत असतो. तसेच शहरातील इतरही काही भागात स्वतंत्र विसर्जन मिरवणुकीचे मार्ग आहेत. विसर्जनासाठी पुणे शहरात १५० पेक्षा
जास्त घाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयात गणेश विसर्जनासाठी पुढीलप्रमाणे मनुष्यबळ लावण्यात
आलेले आहे.

पुणे शहरात ९३ अतिसंवेदनशील मंडळे, १०२ संवेदनशील मंडळे व ८० गर्दिचे चौक/ठिकाणे
आहेत.
 पुणे शहरात एकुण ३,९५९ गणपती मंडळे आहेत.
श्री गणेशोत्सव २०२५ च्या अनुषंगाने परिमंडळीय पोलीस उप आयुक्त, पुणे शहर यांना गर्दिचे
ठिकाणी सर्वेलन्ससाठी मोबाईल सर्वेलन्स व्हेईकल्स पुरविण्यात आल्या आहेत.
 महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग, ध्वनीप्रदूषण नियम २००० च्या अनुषंगाने अंमलबजावणीबबतचा जिल्हाधिकारी तथा जल्हादंडाधिकारी पुणे यांचे कार्यालय यांच्याकडून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक  १२.०० वा. पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तसेच सुट दिलेल्या दिवसांखेरीज इतर दिवशी
ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक मनाई आदेश  दिले आहेत.

 गणेश विसर्जनासाठी पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस आयुक्त, पुणे शहर, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, अपर पोलीस आयुक्त, प्रशासन, पुणे शहर, अपर         पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, अपर पोलीस आयुक्त, पुर्व व पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर तसेच १२ पोलीस उप आयुक्त, ३३ सहाय्यक पोलीस
  आयुक्त, १४१ पोलीस निरिक्षक, ५५८ सपोनि/पोउनि, ६४४३ अंमलदार, ४६ स्ट्रायकींग, १४ क्युआरटी हिट, ०७ बीडीडीएस पथके, ११०० होमगार्ड व ०१ एसआरपीएफ कंपनी    असा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे.

   फरासखाना पोलीस स्टेशन हद्दित २० ठिकाणी वॉच टॉवर उभारून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
         परिमंडळीय स्तरावर पेट्रोलिंग, विभागिय स्तरावर पेट्रोलिंग, पोलीस स्टेशन स्तरावर पेट्रोलिंग, चौकी स्तरावर पेट्रोलिंग करण्यात येणार आहे.  मेट्रो रेल्वेचे स्वारगेटपर्यंत विस्तारीकरण झाले असून, त्यात कसबा पेठ, मंडई या पुण्याचे मध्यवर्ती भागातील स्टेशनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान   सदर मेट्रो स्टेशनवर मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून, संबंधित पोलीस उप आयुक्त व वपोनि यांना बंदोबस्त पुरविणे करीता आदेशित करण्यात आले आहे. गणेश विसर्जन मिरवणुक मार्गावर ठिकठिकाणी पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी ०१ अधिकारी, ०१ महिला अंमलदार व स्वयंसेवक यांची नेमणुक करण्यात आली आहे.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...