ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तिरंगा रॅली.
पुणे : ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदेयांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी बी. एम. संदिप यांच्या प्रमुख उपस्थितीत आज काँग्रेस भवन ते लोकमान्य टिळक पुतळा, मंडई, पुणे पर्यंत ‘‘तिरंगा यात्रा’’ आयोजित करण्यात आली होती. सदर रॅलीमध्ये पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचबरोबर नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आज काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी बी. एम. संदिप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आहे. यानंतर सर्व धर्मिय प्रार्थना करून ‘‘तिरंगा यात्रा’’ सुरू करण्यात आली. यात्रेत ‘‘याद करो कुर्बानी’’, ‘जय हिंद’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या.
यात्रेचा समारोप लोकमान्य टिळक पुतळा, मंडई येथे सभा घेवून करण्यात आला. यावेळी बी. एम. संदिप म्हणाले की, ‘‘या मोहिमेच्या माध्यमातून भारताने आपले लष्करी सामर्थ्य संपूर्ण जगाला दाखवले आहे. विशेष म्हणजे भारताच्या या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे आर्थिक तसेच सामरिक नुकसान झाले आहे. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर राबवताना भारताच्या तिन्ही दलाने आपले शौर्य दाखवले.
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासमवेत, महाराष्ट्राचे प्रभारी बी. एम. संदिप, माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चवधरी, अनंत गाडगीळ, वीरेंद्र किराड, अमीर शेख, गोपाळ तिवारी, लता राजगुरू, अजित दरेकर, रफिक शेख, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी, मेहबुब नदाफ, नीता रजपूत, प्राची दुधाने, अर्चना शहा, वीरेंद्र किराड, सुनिल मलके, प्रकाश पवार, सुरेश नांगरे, सौरभ अमराळे, चेतन आगरवाल, वाल्मिक जगताप, समिर शेख, बाळासाहेब अमराळे, राज अंबिके, विनोद रणपिसे, अभिजीत महामुनी, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, हेमंत राजभोज, राजू ठोंबरे, रमेश सोनकांबळे, रविंद्र माझीरे, अक्षय माने, विशाल जाधव, अजित जाधव, रमेश सकट, दिलीप तुपे, प्रदीप परदेशी, संदिप मोकाटे, भुषण रानभरे, राजेंद्र शिरसाट, कविराज संघेलिका, प्रियंका रणपिसे, सीमा सावंत, अनिता धिमधिमे, स्वाती शिंदे, सुंदर ओव्हाळ, कांचन बालनायक, माया डुरे, ॲन्थोनी जेकब, अरूण वाघमारे, सेल्वराज ॲन्थोनी, अकबर शेख, ॲड. नंदलाल धिवार, हर्षद हांडे यात्रेत सहभागी झाले होते.