पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून उमेदवारी अर्ज स्विकारण्यासाठी मुदत वाढ

Dilip KurhadeCityPune13/12/202520 Views

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून उमेदवारी अर्ज स्विकारण्यासाठी मुदत वाढ.

 पुणे : महानगरपालिका निवडणुक लढविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचा उर्त्स्फुत प्रतिसाद बघता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज देण्याची व घेण्याची दि. १५, १६ डिसेंबर २०२५ असे दोन दिवस वाढवण्यात आलेली आहे.

या कालावधीत इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेऊन व भरून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, काँग्रेस भवन, शिवाजीनगर, पुणे ५ येथे सकाळी ११.०० ते सायं. ५.०० या कालावधीत जमा करावेत अशी माहिती या पत्रकाद्वारे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली आहे.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...