पुण्यनगरीचे श्रावणबाळ अनिल सातव पाटील यांच्याकडून १२ हजार नागरिकांसाठी भव्य महाकाल दर्शन यात्रा

पुण्यनगरीचे श्रावणबाळ अनिल सातव पाटील यांच्याकडून १२ हजार नागरिकांसाठी भव्य महाकाल दर्शन यात्रा

पुण्यनगरीचे श्रावणबाळ अनिल सातव पाटील यांच्याकडून १२ हजार नागरिकांसाठी भव्य महाकाल दर्शन यात्रा

जनसेवेची अखंड परंपरा जपणारे पुण्यनगरीचे श्रावणबाळ अनिल सातव पाटील यांनी आतापर्यंत १२ हजार नागरिकांना मोफत उज्जैन महाकाल दर्शन घडवत समाजसेवेचे अनोखे उदाहरण निर्माण केले आहे. नागरिकांची बाबा महाकालांच्या दर्शनाची इच्छा पूर्ण व्हावी, याकरिता त्यांनी ही भव्य मोफत उज्जैन दर्शन यात्रा आयोजित केली.

या यात्रेअंतर्गत भाविकांना पुणे रेल्वे स्टेशनपर्यंत ने-आण, त्यानंतर स्पेशल रेल्वेद्वारे उज्जैनकडे प्रवास, तसेच उज्जैनमध्ये निवास व भोजनाची सर्व सोय अनिल सातव पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली. विशेष म्हणजे भाविकांना फक्त महाकालांचे दर्शनच नव्हे, तर सभोवतालचा ऐतिहासिक व पवित्र परिसर देखील दाखविण्यात आला.

यावेळी एका भाविकाने बोलताना सांगितले की, “यात्रेचे संपूर्ण आयोजन अत्यंत नियोजनबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने करण्यात आले होते. ट्रेनमध्येही भोजनाची, चहा नाश्त्याची सोय, वैद्यकीय पथक व डॉक्टरांची प्रत्येकाकडे जाऊन प्रकृतीची विचारपूस व तपासणी करणे अशा सर्व सुविधा पुरवून भाविकांचा संपूर्ण प्रवास अविस्मरणीय व आनंददायी करण्यात आला.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...