पुण्यात घर बांधायचे आहे; घराला विमान धडकणार नाही याचा परवाना घ्या  

सौजन्य चॅट जीपीटी प्रातिनिधिक छायाचित्र
पुण्यात घर बांधायचे आहे; घराला विमान धडकणार नाही याचा परवाना घ्या  
 पुणे शहर , पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडी हद्दीत घर बांधण्यासाठी ‘मिनिस्ट्री ॲाफ डिफेन्स’ (एमओडी) ची परवानगी
पुणे :  स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते घर स्वतःच्या जागेत बांधायचे म्हटले कि वेगळाच आनंद असतो. स्वतःच्या जागेत घर बांधायचे म्हटले की महापालिका बांधकाम विभागाची परवानगी आली. मात्र महापालिका घराला विमान धडकणार नाही ना ? याची संरक्षण मंत्रालयाची परवानगी मागते. त्यासाठी प्रथम  पुणे शहर किंवा जिल्ह्याचा नकाशा घेणे, तो नकाशा मोनार्क या संस्थेला देऊन त्यांच्याकडून घराचे चारही टोकांचे अक्षांश व रेखांश घेऊन नकाशा तयार करणे त्यासाठी मोनार्कला वीस हजार रूपये शुल्क द्यावे लागतात. घराची उंची नव्वद मीटरपेक्षा अधिक असेल तर गुजरात, गांधीनगर येथील संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयातून परवानगी घेणे, येथे मध्यस्थ किंवा दलालांना एक ते दीड लाख रूपये देऊन परवाना घेणे आवश्यक असते. त्यानंतर घर बांधण्याची परवानगी मिळते. संपूर्ण भारत देशात हा नियम फक्त पुणे शहराला लागू आहे. त्यामुळे पुणेकरांचा अंत किती पाहणार असा प्रश्न सामान्य नागरिकाला पडल्याशिवाय राहत नाही.  पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्हा नकाशांची विक्री बंद झाली आहे.  पुणे वगळता राज्यातील कोणत्याच शहरातील नकाशांची विक्री बांधकामासाठी होत नाही.
पुणे शहरात हवाईदल व विमानतळ असल्यामुळे घराचे बांधकाम करताना मिनिस्ट्री ॲाफ डिफेन्स (एमओड) ची परवानगी घ्यावीच लागते. अन्यथा महापालिका बांधकाम विभाग परवानगी देत नाही. मोनार्क या संस्थेला भारत सरकारने परवानगी दिली आहे.
 उप अभियंता, बांधकाम विभाग , पुणे महापालिका.
 संरक्षणदृष्ट्या पुणे शहर महत्वाचे ठिकाण पुणे शहरात हवाई दलाचे विनानतळ, एनडीए, दक्षिण कमांडचे मुख्यालय, खडकी दारूगोळा कारखाना, पुणे, खडकी व देहू रोड अशी तीन कॅन्टोन्मेंट आहेत. त्यामुळे पुणे शहर देशाच्या संरक्षणदृष्ट्या अतिशय महत्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे एनओडीची परवानगी लागत असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते रामभाऊ फुगे यांनी सांगितले.
 एक ते दीड गुंठ्यावर बांधकाम करणाऱ्यांना का?
 एमओडीचा ना हरकत परवाना  शहरात एक ते दीड गुंठ्यावर बैठे घर किंवा दुमजली घर बांधणाऱ्यांना का एमओडीचा परवाना असा प्रश्न पुणेकरांनी विचारला आहे. आधीच महागाईमुळे घर बांधणे खर्चीक झाले आहे. त्यात यासाठी वीस हजार रूपये शुल्क भरणे अवघड असल्याची प्रतिक्रिया संचल बेंगळे यांनी दिली आहे. 

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...