प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विविध देशांतील गुंतवणूकदारांशी संवाद

Dilip KurhadeNational01/05/202527 Views

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विविध देशांतील गुंतवणूकदारांशी संवाद

सृजन क्षेत्रातील ऑरेंज इकॉनॉमीला गती देण्यासाठी उद्योजकांनी भरीव योगदान द्यावे

-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आवाहन

·

मुंबई : मुंबईमध्ये सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध देशांमधील प्रमुख उद्योजकांशी संवाद साधला.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमधील लोटस बॉलरूममध्ये विविध देशातील प्रतिनिधींची गोलमेज बैठक झाली. यावेळी प्रधानमंत्री श्री मोदी यांनी उपस्थित उद्योजकांशी सविस्तर चर्चा केली.

या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, केंद्रीय सचिव संजय जाजू तसेच उद्योजक ॲडम ग्रॅनिटी, ॲडम मोसरी, आदर पुनावाला, अजय बिजली, अक्षत राठी, अक्षय विधानी, भूषण कुमार, चांघाम किम, चार्ली जेफरी, डायन स्मिथ गंडर, एकता कपूर, प्रिन्स फैजल बिन बंदर बिन सुलतान अल सौद, सुबासकरण अलीराजाह, शूजी उत्सुमी, शरद देवराजन, शंतनू नारायण, संकेत शाह, संजीव गोयंका, राल्फ सिमोन, राजन नवानी, पिरोजशा गोदरेज, नितीश मिटरसेन, अलेक्झांडर झरोव, क्रिस रिप्लेय, दिनेश विजन, लिझवेटा ब्रॉडस्काया, हर्ष जैन, फरहान अख्तर, हार्वेय मासोन, हिरोकी टोटोकी, जोंग बम पार्क, लुईस बॉसवेल, महेश सामत, मार्क रीड, नमीत मल्होत्रा, निल मोहन उपस्थित होते.

भारताच्या जीडीपीमध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असणार आहे. कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर यावर आधारित ऑरेंज इकॉनॉमी पुढील १० वर्षांत दुप्पट होणार आहे. या इकॉनॉमीला आणखी गती देण्यासाठी उद्योजकांनी भरीव योगदान द्यावे, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

भारताने सृजन क्षेत्राच्या विकासासाठी उचलेले पाऊल अत्यंत सकारात्मक असून त्यास सर्व उद्योजक उत्स्फूर्तपणे साथ देतील, असा विश्वास सर्व उपस्थित उद्योजकांनी व्यक्त केला.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Loading Next Post...
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...