
आदरणीय श्री. प्रसाद नारायण हसबनीस
कर्तव्यनिष्ठेचा अभेद्य प्रवास
श्री. प्रसाद नारायण हसबनीस यांनी मार्च १९८३ मध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेत प्रवेश
करून अखंड ३६ वर्षे लाचलुचपत प्रतिबंध, गुन्हे प्रकटीकरण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय
कार्य केले आहे.
बृहन मुंबई पोलीस दल, पुणे शहर पोलीस, विशेष शाखा तसेच येरवडा आणि कोंढवा सारख्या संवेदनशील पोलीस
ठाण्यांमध्ये त्यांनी यशस्वी कारभार केला. त्यांच्या कार्यकाळात मोठे दरोडे, सोन्याची चोरी, आंतरराष्ट्रीय कार्गो चोरी,
आंतरराज्य वाहन चोरी यांसारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणत अनेक आरोपींना अटक करून मोठ्या प्रमाणात
मालमत्ता जप्त करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवताना, जातीय तणावाच्या परिस्थितीत समाजातील सर्व घटकांशी विश्वासाचे संबंध
निर्माण करून त्यांनी तणावपूर्ण प्रसंग कुशलतेने हाताळले. लाचलुचपत प्रतिबंध विभागात असताना त्यांनी अनेक
यशस्वी सापळे रचून लाचखोरांना रंगेहात पकडले. त्यांच्या सेवाकाळात त्यांना ३१५ बक्षिसे, ३२ प्रशंसापत्रे प्राप्त झाली
असून २०११ साली पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह आणि २०१२ साली राष्ट्रपतींचे पोलीस पदक त्यांना प्रदान
करण्यात आले. त्यांच्या संपूर्ण सेवाकाळात एकही शिक्षा न मिळवता त्यांनी आपला अभिलेख उत्कृष्ट ठेवला आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन दैनिक महा मेट्रो तर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले.