बकरी ईद निमित्त आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली नियोजन बैठक

Dilip KurhadeCityPCMC30/05/202536 Views

बकरी ईद निमित्त आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली नियोजन बैठक
पिंपरी : बकरी ईदच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे सर्व संबधित विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले. बकरी ईद सणाचे महत्व लक्षात घेऊन नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन  आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत पिंपरी येथील महापालिका मुख्य कार्यालयातील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहामध्ये आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर,  मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता देवण्णा गट्टूवार, अजय सूर्यवंशी, नितीन देशमुख, उप आयुक्त संदिप खोत, सचिन पवार, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे, कार्यकारी अभियंता हरविंदर  बन्सल, प्रेरणा सीनकर, सुनीलदत्त नरोटे, बी.पी. लांडे आदी उपस्थित होते. तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक कडलग, गणेश जामदार कुरेशी संघटनेचे रफिक कुरेशी, गफूर कुरेशी, युसुफ कुरेशी,वाहिद कुरेशी, हमीद कुरेशी, मुबीन शाबीर कुरेशी, शादाब फैय्याज कुरेशी, शकील कुरेशी यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महापालिकेने तयार केलेल्या तात्पुरत्या स्वरूपातील कुर्बानीच्या ठिकाणी  पुरेशा पाण्याचा पुरवठा , पुरेसे मनुष्यबळ नेमणूक तसेच वेस्ट उचलण्यासाठी आवश्यक यंत्रणा, स्वच्छता या सर्व बाबीचे व्यवस्थिपणे नियोजन करण्याचे निर्देश आयुक्त सिंह यांनी संबधित विभागांना दिले. तर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...