बीएसआय’ वे एक लाख १२ हजार वनस्पतींच्या ( हर्बेरियम) नमुन्यांचे डिजिटायझेशन
एकही रूपया खर्च न करता सहा महिन्यात विद्यार्थ्यांनी सरकारचे एक कोटी ६८ लाख रूपयांची केली बचत
पुणे :महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यातील तब्बल एक लाख १२ हजार वनस्पतींचे ( हर्बेरियम) नमुन्यांचे डिजिटायझेशन केले आहे. एक ही रूपया खर्च न करता विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी सहा महिन्यात हे संकलन केल्याची माहिती भारतीय वनस्पती सर्वेक्षण ( बॅाटनिकल सर्वे ॲाफ इंडिया) अर्थात बीएसआयचे प्रभारी अधिकारी डॅा ए बेंनियामिन यांनी सागितले.
भारतात वनस्पतींचे असंख्य नमुने आढळतात. यातील अनेक नमुन्यांचा अजून शोध सुरूच आहेत. ‘ बीएसआय’ने महाराष्ट्र ? गोवा व कर्नाटक राज्यातील सह्याद्री पर्वत रांगेत , महाबळेश्वर, कोकण भागात अनेक दुर्मिळ वनस्पतीच्या नमुन्यांचे संकलन केले आहे. पुणे येथील बीएसआयने एक लाख १२ हजार वनस्पतींच्या ( हर्बेरियम) संकलन केले आहे. या अमूल्य ठेव्याचे डिजिटायझेशन करणे आवश्यक होते. त्यासाठी पुणे शहरातील महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना आवाहान केले होते. याला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यानी संगणकाच्या मदतीने प्रत्येक वनस्पतीचे छायाचित्रांसह माहितीची नोंद केली गेली. प्रत्येक बॅचमध्ये वीस विद्यार्थ्यांनी सोमवार ते शुक्रवार दरम्यान वनस्पतींचे डिजिटायझेशन केले.
डिझिटायझेशनचे काम जर खासगी संस्थेला दिले असते तर त्यांनी एका वनस्पतीचे डिजिटायझेशनसाठी दीडशे रूपये दर आकारला असता. त्यामुळे एक लाख १२ हजार वनस्पतीचे एक कोटी ६८ लाख रूपये खर्च झाले असते. मात्र, विद्यार्थ्याच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे एकही रूपया खर्च करता आले नाही. सरकारचे पैसे ही वाचले व विद्यार्थ्याना वनस्पतींचा समृध्द खजीना अनुभवता आला. याचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यात संशोधनासाठी होऊ शकतो, असे डॅा बेनियामिन यांनी सांगितले.
“ महाराष्ट्र, गौवा आणि कर्नाटक विविघ वनस्पतींनी समृध्द आहे. यातील अनेक वनस्पती दुर्मिळ आहेत. संशोधक आजही नवनवीन वनस्पतींच्या शोधात आहेत. भारतीय वनस्पती सर्वेक्षणकडे असलेल्या एक लाख १२ हजार वनस्पती ( हर्बेरियम) नमुन्यांचे डिजिटायझेशन केले आहे. त्यामुळे पुढील कित्येक शतकानंतरही वनस्पतींची संपुर्ण माहिती एक क्लिकमध्ये मिळू शकते.”
– डॅा . ए. बेनियामिन, प्रभारी अधिकारी, भारतीय वनस्पती सर्वेक्षण
बीएसआय कडे ऐंशी ते शंभर वर्षापूर्वीच्या वनस्पतीचे नमुने
भारतीय वनस्पती सर्वेक्षणकडे महाराष्ट्रातीस अतिदुर्मिळ वनस्पतीचे नमुने संग्रहित आहेत. प्रत्येक वनस्पतीचे नमुने सुरक्षित लॅाकरमध्यो ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे लुप्त झालेल्या वनस्पतीचे नमुने सुद्धा या ठिकाणी पाहण्यास मिळतात.