भांबुर्डा येथील बोगस संस्थेच्या नावाने भूखंड लाटला 

भांबुर्डा गोखलेनगर येथील सर्वे क्रमांक ९८ व ९९ ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ६० येथील सीमा भिंत तोडून बांधकाम व्यावसायिकाला ती पुन्हा आरसीसी मध्ये बांधण्यासाठी शिक्षण मंडळाकडूनच परवानगी देण्यात आली व सदर भिंती शेजारी नैसर्गिक उद्याचा प्रवाह वळवला जात आहे
भांबुर्डा येथील बोगस संस्थेच्या नावाने भूखंड लाटला 
 गृहनिर्माण संस्थेत बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यालयातील कर्मचा-यांची नावे ; भारती विद्यापीठातील माजी कुलगुरू संस्थेचे प्रवर्तक 

पुणे  : भांबुर्डा, गोखले नगर येथील मेंढी फार्म जवळील सर्वे क्रमांक ९८ व ९९ च्या शेजारील महाराष्ट्र गृह निर्माण महामंडळाची ( म्हाडा) ३२ हजार चौरस फुटाचा भूखंड भारती विद्यापीठाचे माजी कुलगुरू व एका दिवंगत माजी आमदाराने लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. विशेष म्हणजे हा भूखंड ज्या बांधकाम व्यवसायिकाला विकसनासाठी दिले आहे त्या व्यावसायिकाच्या कार्यालयातील कर्मचारी गृह निर्माण मंडळाचे सभासद आहे. हा भूखंड अनुसूचित जाती व भटक्या विमुक्तांच्या सभासदांच्या नावाने हा भूखंड लाटला आहे. राजकीय पुढारी,म्हाडाचे पदाधिकारी व  अधिकारी आणि बांधकाम व्यवसायिकांच्या संगनमताने हा भूखंड  वाटल्याचे समोर आले आहे.
भांबुर्डा येथील सर्वे क्रमांक ९८ व ९९ येथे भारत देसलडा या बांधकाम   या  बांधकाम व्यवसायिकाचे गृह प्रकल्पाचे काम सुरू आहे. येथील एका झाडाची अडचण संबंधीत  बांधकाम व्यवसायिकाला होत होती. त्यामुळे चक्क वनखात्यानेच हे झाड तोडले होते. याची माहिती सामाजिक कार्यकर्ते समिर निकम यांना समजली पुणे  शहरातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्या देखत त्यांच्याच हद्दीतील वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत होती. यासह येथील ओढ्याची दिशा बदलण्याचा प्रकार संबंधित बिल्डरकडून  झाला होता.  महापालिका  बांधकाम विभागाने सुद्धा  डोळेझाक करत याच्यावर कारवाई केली नव्हती. त्यामुळे निकम यांनी संबंधीत जागा व येथील गृहनिर्माण संस्थे बाबत माहिती घेण्यास सुरवात केली. यावेळी निकम यांना अनेक धक्कादायक प्रकारांची माहिती  समोर आली.
जिव्हाळा गृहनिर्माण संस्था नोंदणीकृत नसताना भारती विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू यांनी संस्थेचे प्रवर्तक असल्याचे दाखवून म्हाडाची तब्बल ३२ हजार चौरस फूटाचा भूखंडावर अनुसूचित जाती व भटक्या विमुक्तांसाठी गृहनिर्माण संस्था करण्याचे भासवून भूखंड लाटला. यामध्ये म्हाडाचे पदाधिकारी, अधिकारी व राजकीय नेते मंडळींच्या वरदहस्ताने अस्तित्वात नसलेल्या संस्थेला भूखंड देण्यात आले.

पुणे शहरातील जिव्हाळ्याचा भूखंड घोटाळा!
शासकीय कामकाजामध्ये अथवा कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास त्यासाठी रीतसर नोंदणीकृत संस्था असणे गरजेचे असते.  संस्था नोंदणी नसताना सदर संस्थेत बत्तीस हजार चौरस फुटाचा भूखंड २००६ साली पुणे गृहनिर्माण म्हाडाने  दिला. व सदर संस्थेची नोंदणी ही २००९ साली होते. सर्वसामान्यांना व वेगवेगळ्या क्षेत्रातील म्हाडाच्या भूखंडाचा अथवा सदनिकांचा लाभ घेण्यासाठी अनेक कठोर कायदेशीर बाबींना सामोरे जावे लागते परंतु या ठिकाणी सर्वे नंबर ९९ जिव्हाळा सहकारी गृहनिर्माण संस्था गोखलेनगर येथील भूखंड कोणताही नोंदणीकृत संस्था नसताना त्याचबरोबर सदर संस्थेमध्ये जे लाभधारक दाखवण्यात आले . ते बोगस असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. सदर संस्थेमध्ये श्रीरामपूर, नगरचे माजी  आमदार दिवंगत जयंत ससाणे प्रवर्तक पद घेऊन त्यामध्ये लाभार्थ्यांच्या यादीत दिवंगत नाव असल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्यांच्या वाट्याचा आमदार साहेब लाभार्थी म्हणून लाभ कसे घेऊ शकतात हा प्रश्न पडतो. सदर प्रकरण २००६ ते २००९ दरम्यानचे असून या ठिकाणी होत असलेल्या बेसुमार वृक्षतोडीबाबत तक्रार देणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमी समीर निकम यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीतून सदर धक्कादायक बाबी समोर आले आहे.

“ भांबुर्डा गोखलेनगर येथील सर्वे क्रमांक ९८ व ९९  ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ६० येथील सीमा भिंत तोडून बांधकाम व्यावसायिकाला ती पुन्हा आरसीसी मध्ये बांधण्यासाठी शिक्षण मंडळाकडूनच परवानगी देण्यात आली व सदर भिंती शेजारी नैसर्गिक उद्याचा प्रवाह वळवला जात आहे या सर्व गोष्टी सदर भूखंडा साठी केल्या गेल्या असून या ठिकाणी वनविभाग, पुणे महानगरपालिका, गृहनिर्माण विभाग म्हाडा, तसेच महसूल विभाग यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येत आहे. पुणे शहरातील हा मोठा भूखंड घोटाळा आहे.”

– समिर  निकम , सामाजिक कार्यकर्ते

‘‘ जिव्हाळा गृहनिर्माण संस्था ( नियोजित) या संस्थेने २००६ भूखंडासाठी नियमित शुल्क एक कोटी ३५ लाख १३ हजार पाचशे रूपये भरले आहे. यासह संस्था २००९ मध्ये सहकार उपनिबंधक कार्यालयात नोंदणी करण्यात आली आहे. संस्थेत नियमाप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त यांच्यांसह इतर सभासदांचा समावेश आहे. ’’
– भारत देसलडा  , बांधकाम व्यवसायिक

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...