मतदार ‘राजा‘ ची किंमत एक किलो ‘चिकन‘ आणि एक प्लेट ‘मिसळ‘

मतदार ‘राजा‘ ची किंमत एक किलो ‘चिकन‘ आणि एक प्लेट ‘मिसळ‘
शहराच्या उपनगरातील प्रभागात रंगले खेळ पैठणीचे ; मतदारांना  डिनर सेट, साडी, सोन्याचे दागिन्यांसह हेलिकॉप्टर राईड आणि परदेशवारीचे आमिष
पुणे महापालिकेचा दर वर्षाचा अर्थसंकल्प बारा हजार ते पंधरा हजार  कोटी पेक्षा अधिक आहे. सत्ताधारी नगरसेवकांना दरवर्षी सरासरी दहा कोटी पेक्षा अधिक निधी मिळतो. या प्रमाणे पाच वर्षात पन्नास कोटी रूपयांचा निधी मिळतो. हा निधी आमदार व खासदारांपेक्षा अधिक आहे.  नगरसेवक झाल्यानंतर शहरात  सुरू असलेल्या बांधकाम व्यावसायिकांना विविघ परवाने  मिळवण्यासाठी रेडकार्पेट टाकणे, ते परवाने मिळवून देणे त्या बदल्यात ‘लायझनिंग‘ या गोंडस नावाखाली कोट्यावधी रूपयांचा मलिदा खाणे, त्यानंतर सत्तेच्या माध्यमातून पुन्हा पैसा मिळवणे आणि या पैशातून पुन्हा सत्ता मिळविणे हे दृष्टचक्र सुरू राहते. मतदार ‘ राजा‘ कवडीमोल किंमतीत विकले जात आहेत.
 दिलीप कु-हाडे ( दैनिक महा मेट्रो न्यूज नेटवर्क) 
पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडक्या बहिणीने तारले हे सर्वश्रुत आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेत लाडक्या बहिणींना खूष करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्य इच्छुकांनी कंबर कसली आहे. इच्छुक उमेदवार प्रभागातील मतदारांना विशेषता: महिला मतदारांना खूष  करण्यासाठी खेळ पैठणीचा हे कार्याक्रम घेतले जात आहेत. यासह प्रत्येक महिलेला साडी भेट दिली जात आहे ( * फक्त प्रभागातील महिलांना तेही मतदार ओळखपत्र असणे बंधनकारक ) यासह मतदारांना देवदर्शन राज्यातील धार्मिकस्थळे व परराज्यातील धार्मिक स्थळांचा समावेश आहे.  उज्जैन येथील महा कालेश्वर दर्शनासाठी संपूर्ण रेल्वे आरक्षित करून मतदारांना मोफत देवदर्शनासाठी पाठविले जात आहे.
पुणे महापालिका निवडणुका २०२२ साली होणे अपेक्षित होते. सुरवातीला इतर मागासवर्ग आरक्षणाचा मुद्दा व इतर कारणांमुळे महापालिका निवडणुका लांबत गेल्या. अखेर साडेतीन ते चार वर्षानंतर न्यायालयाच्या आदेशाने निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यामुळे निवडणुका लढण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.
वडगांव शेरी मतदारसंघात प्रभाग एक,तीन आणि चार प्रभागातील मधील इच्छुकांनी निवडणुकीत विजयी होण्यासाठी मतदारांवर भेट वस्तूंचा वर्षाव सुरू केला आहे.नवरात्री उत्सवाची संधी साधून इच्छुक उमेदवारांनी भव्य गरबा दांडिया,पैठणी साड्या , इलेक्ट्रिक वस्तूंच्या बक्षिसांची लयलूट केली.त्यामुळे या तीन प्रभागातील महिला मतदारांची अजून  दिवाळी सुरू आहे.
प्रभाग  तीन विमाननगर लोहगाव व  आणि प्रभाग चार खराडी वाघोली प्रभागातील इच्छुकांनी विशेष रेल्वे आणि बस गाड्या करून मतदारांना उज्जैन येथील महाकाल चे मोफत देवदर्शन यात्रा घडवून आले. तीन चार वेळा यात्रा घडवून आणून उमेदवारांनी कोट्यवधी रुपये खर्च करून निवडणुकीसाठी देव पाण्यात ठेवले आहे.
या आठवड्यात  निवडणुकीची आचारसंहिता
जाहीर होण्याची शक्यता आहे.ही शक्यता गृहीत धरून या तीन प्रभागातील इच्छुकांनी आता खेळ पैठणीच्या कार्यक्रमावर जोर दिला आहे.एका विद्यमान लोकप्रतिनिधींच्या कुटुंबीयाने महिला मतदारांसाठी खेळ पैठणीच्या स्पर्धेत सहभागी महिलांसाठी डिनर सेट देणार दिले . कार्यालयाच्या मुख्य आकर्षण पाच दिवसांची थायलंड  कपल टूर ठेवली आहे. तसेच अकरा विजेत्यांना हेलिकॉप्टर राईड,सोन्याचे दागिने आणि आकर्षक भेट वस्तू देणार आहे.
प्रभाग एक मध्ये इच्छुक उमेदवाराने खेळ पैठणीच्या कार्यक्रमात पाच हजार पैठणी साड्या,एक दुचाकी आणि भेट वस्तूंची वाटप केले .त्यामुळे प्रतिस्पर्धी दोन उमेदवारांनी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.यामध्ये माजी नगरसेविकेने स्पर्धेत चक्क चार चाकी मोटार कार आणि पाच दुचाकी चे बक्षीस जाहीर केले आहे.भाजपच्या एका इच्छुकाने स्पर्धेत पाच दुचाकी ,टिव्ही,फ्रिज, कूलर आणि वॉशिंग मशीन असंख्य वस्तूंची लयलूट करणार आहे.
हा सर्व प्रकार लोकशाहीची थट्टा आहे. याला मतदारराजा बळी पडत आहे. याला कारणीभूत येथील भ्रष्ट व्यवस्था आहे. कोणाचा कोणावर अंकुश नाही. लोकशाहीचे चार स्तंभ ( कायदेमंडळ, प्रशासन, न्यायपालिका आणि माध्यमे हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत.) सध्या महात्मा गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे भूमिका बजावत तर नाही ना ? अशी शंका आल्या शिवाय राहत नाही .

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...