महात्मा गांधी यांच्या पुतळा विटंबना निषेधार्थ शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन

पुणे स्टेशन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन.

 

रविवारी रात्री पुणे रेल्वे स्थानकाबाहेर एका तरूणाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक आणि निंदनीय घटना घडली. भगवी वेशभूषा परिधान केलेल्या या व्‍यक्तीने गांधीजींच्या पुतळ्याच्या पायथ्याशी चढून शस्त्राच्या साहाय्याने त्यांच्या शिराची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पुणे स्टेशन येथील महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘पुणे शहर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे एक ऐतिहासिक व सखोल नाते आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये त्यांची २१ महिन्यांची नजरकैद, तसेच त्यांनी येथे केलेले उपवास आणि आंदोलन, यामुळे पुणे हे शहर गांधी विचारांच्या पवित्र आठवणींशी जोडले गेले आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील गांधीजींचा पुतळा हा लाखो नागरिकांच्या श्रध्देचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा केंद्रबिंदू आहे. ही घटना केवळ पुतळ्याची विटंबना नसून, ती पुण्याच्या पुरोगामी वैचारिक वारशावर आणि सामाजिक सलोख्यावर आघात करणारी आहे. समाजात वारंवार अशा प्रकाररच्या घटना घडूनही, संबंधित आरोपीला मानसिक आजारी म्हणून घोषित करून प्रकरण रद्दबातल करू नये त्याला कठोरात कठोर शिक्षा व्‍हावी अशी मागणी या आंदोलनाद्वारे आम्ही करीत आहोत. तसेच या प्रकरणासंदंर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ व विधानसभेचे सभागृहनेते मा. विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करून सदर मुद्दा पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न म्हणून उपस्थित करावा आणि अशा गुन्हेगारांवर अजामिनपात्र गुन्हा दाखल करून कठोरात कठोर शिक्षा करावी असा सरकारकडून अद्यादेश पारीत करून घ्यावा.’’

यानंतर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड हे म्हणाले की, ‘‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा सुरज शुक्ला नामक व्‍यक्ती वाराणसी मधून आलेला आहे येताना तो हत्यार सोबत घेवून आला होता. वाराणसी येथील काँग्रेसचे स्थानिक अध्यक्षांशी चर्चा करून सदर व्‍यक्ती कोणत्या पक्ष किंवा संघटनेशी संबंधित आहे का? ही चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.’’

यानंतर शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. त्यानंतर झोन २ चे पोलीस उपायुक्त मा. मिलिंद मोहिते यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी महापौर कमल व्‍यवहारे, माजी नगरसेवक रफिक शेख, अविनाश बागवे, अजित दरेकर, मेहबुब नदाफ, राज अंबिके, प्राची दुधाने, सीमा सावंत, अनुसया गायकवाड, सुंदर ओव्‍हाळ, उषा राजगुरू, माया डुरे, ॲड. राजश्री अडसुळ, मंदा जाधव, प्रदिप परदेशी, राजेंद्र भुतडा, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, रमेश सोनकांबळे, हेमंत राजभोज, विनोद रणपिसे, भगवान कडू, रवि पाटोळे, कृष्णा सोनकांबळे, मतिन शेख, आबा जगताप, दिपक ओव्‍हाळ, राज घेलोत, देविदास लोणकर, संतोष सुपेकर, अमित कांबळे, चेतन पडवळ आदींसह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. 

Recent Comments

No comments to show.
Categories
Loading Next Post...
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...