महापुरुषांनी विकासाचा मार्ग आखला
— बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे
पुणे :कोल्हापूर संस्थानांचे राजे राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या राज्यातील उपेक्षित वंचित बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. अस्पृश्यतेचे उच्चाटन, सक्तीचे शिक्षण , शेती, उद्योग, कला, क्रीडा, आरोग्य क्षेत्राला शाहू महाराजांनी चालना दिली. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन मूकनायकला आर्थिक मदत केली महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी काम केल्यामुळेच त्यांना लोककल्याणकारी राजा म्हणून संबोधले जाते . महापुरुषांचे विचार आपण आचरणात आणावेत असे मत बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन प्रसंगी बोलताना व्यक्त केले .
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे दिनांक ६ मे २०२५ रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस मा महासंचालक वारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी निबंधक इंदिरा अस्वार, विभागप्रमुख स्नेहल भोसले , वृषाली शिंदे , उमेश सोनवणे, दादासाहेब गिते, शुभांगी पाटिल यांनीही अभिवादन केले.
विभागप्रमुख उमेश सोनवणे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा दिला.
यावेळी बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सुत्रसंचलन रामदास लोखंडे यांनी केले. आभार डॉ अंकुश गायकवाड यांनी मानले.