महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय येथे मराठी लघुपट लक्ष्मी चा मुहूर्त

महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय येथे मराठी लघुपट लक्ष्मी चा मुहूर्त

पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय येथे मराठी लघुपट लक्ष्मी चा मुहूर्त  करण्यात आला.
ड्रीम क्राफ्ट फिल्म्स प्रस्तुत एम अँड एम क्रिएटिव्ह प्रोडक्शन निर्मिती व शान फिल्म्स प्रोडक्शन च्या वतीने “लक्ष्मी” लघुपट साकारला जाणार आहे. यावेळी शान फिल्म्स प्रोडक्शन चे मुख्य अधिकारी शब्बीर पुनावाला यांच्या उपस्थितीत मराठी चित्रपट लक्ष्मी चा मुहूर्त मोठ्या थाटामाटात सुरवात करण्यात आली. या फिल्म चा पहिला क्लॅप माजी महापौर, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ( गट ) व महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयचे चेअरमन अंकुश काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. लक्ष्मी फिल्म चे दिग्दर्शक शाहानवाज शेख,एम अँड एम क्रिएटिव्ह प्रोडक्शन चे मुख्य अधिकारी नितीन चंदन यांच्या हस्ते सर्व प्रोडक्शन टीम आणि कलाकारांच्या उपस्थितीत होते. यावेळी अभिनेत्री दक्षा कोळगावे, किशोर निलेवाड, आसावरी कुलकर्णी, धिरज बिडवे, सारिका शेठ, प्रियांका मेश्राम, महेश कांबळे , सिनेमॅटोग्राफर हैदर अली पुनवाला, फोकस पुलर सिकंदर खान,कॅमेरा असिटंट अम्मार पुनवाला, जेम्स पग्गी, सैराट व झुंड फेम मेकअप आर्टिस्ट मंगेश गायकवाड, साउंड आर्टिस्ट विकी मोरे, कॉस्ट्यूम डायरेक्टर कोमल जावीर, योगेश चव्हाण,फोटोग्राफर चंद्रकांत देवघरे, प्रोडक्शन मॅनेजर प्रियांका मेश्राम, सारथी पिक्सल चे मुख्य अधिकारी आर्ट डायरेक्टर निशांतकुमार शर्मा, सुमुख फिल्म्स कास्टिंग चे मुख्य अधिकारी सुमुख टोरो, प्रोडक्शन मॅनेजमेंट गोविद मेखले उपस्थित होते.

   आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि स्त्री सबल कशी होईल, समाजात महिला ही सशक्त कशी होईल याबाबत सुदृढ विचार व्हायला हवे हे लक्ष्मी या फिल्म मधून   आपल्याला पाहता येणार आहे असे दिग्दर्शक शाहानवाज शेख यांनी सांगितले.

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...