मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन

Dilip KurhadePune10/05/202575 Views

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन

 

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर आळंदी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.

यावेळी आळंदी देवस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, ‘पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस सहआयुक्त वसंत परदेशी, विश्वस्त श्री योगी निरंजननाथ, ॲड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कुबेर, डॉ. भावार्थ देखणे, पुरुषोत्तम पाटील, ॲड. रोहिणी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी मंदिर देवस्थानच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा तुळशीची माळ देऊन सत्कार करण्यात आला.

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...