मुरुड बीचलगत सुमारे एक किलोमीटर लांब चौथरा

Dilip KurhadeKokan12/05/2025192 Views

मुरुड बीचलगत प्रशस्त चौथरा बांधण्यात आला आहे.
मुरुड बीचलगत सुमारे एक किलोमीटर लांब चौथरा
तिहासिक सागरी किल्ला जंजिरालगत असलेला मुरुडचा समुद्रकिनारा सागरप्रेमींना नेहमीच भुरळ  घालत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत मुरुड बीचलगत प्रशस्त चौथरा बांधण्यात आला आहे. सुमारे एक किलोमीटर लांबीच्या या चौथर्‍यावर रोज संध्याकाळी विविध कला गुणदर्शनाचे कार्यक्रम होतात. या ठिकाणी सागरी खाद्यपदार्थ आणि इतरही अनेक चवदार पदार्थांचे स्टॉल असल्याने येथे पर्यटकांची पोटपूजा आणि करमणूकही होत आहे. या लगतच पार्किंगसाठी प्रशस्त जागा उपलब्ध करून दिल्याने पर्यटकांची चांगली सोय झाली आहे. दिवसेंदिवस मुरुडचा बीच भरपूर गर्दी खेचणारा ठरेल यात शंका नाही. (छायाचित्र- गिरीश कुलकर्णी)

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...