मुळशीमधील नेरे दत्तवाडीमध्ये कोसळलेले ३ वीजखांब उभारून वीजपुरवठा सुरळीत

मुळशीमधील नेरे दत्तवाडीमध्ये कोसळलेले

३ वीजखांब उभारून वीजपुरवठा सुरळीत

पुणे: मुळशी तालुक्यातील नेरे दत्तवाडीमध्ये वादळ व मुसळधार पावसामुळे गुरुवारी (दि. २२) महावितरणचे तीन वीजखांब कोसळले होते. त्यामुळे १८ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. पावसाची संततधार सुरूच राहिल्याने परिसरात चिखल व शेतात पाणी साचले. त्यामुळे वीजखांब उभारण्यास व इतर दुरुस्ती कामांना विलंब झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी तीन वीजखांब उभारून रविवारी सकाळी ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू केला. मात्र त्यापैकी तीन वीजग्राहकांकडील सर्व्हीस केबलमध्ये बिघाड झाला असून भर पावसात जनमित्रांकडून आज सायंकाळी उशिरापर्यंत दुरुस्ती सुरू होती. तासाभरात या तीन ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात येईल.

Recent Comments

No comments to show.
Categories
Loading Next Post...
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...