
यल्लमा देवीच्या चांदीचा मुखवटा चोरणा-या चोराला ठोकल्या बेड्या
देवीचा मुखवटा मिळताच तृतीयपंथीयांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यातून काढली मिरवणूक
पुणे : येरवडा, नगर रस्त्यावर तृतीयपंथी समुदायाचे यल्लमा देवीचे मंदिर आहे. मंदिरात देवीचा चांदीचा मुखवटा होतो . शुक्रवारी पहाटे एका चोरट्याने मंदिरातून देवीचा चांदीचा मुखवटा चोरून नेला. त्यामुळे तृतीयपंथीयांच्या भावना दुखावल्या होत्या.लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यातील पोलीसांनी अवघ्या काही तासांत चोरट्याला ताब्यात घेतले. तर पुण्यातील एका सोनाराकडून पोलीसांनी देवीचा चांदीचा मुखवटा मिळाला . देवीचा मुखवटा परत मिळताच तृतीयपंथीयांनी एकच जल्लोष केला . त्यांनी मुखवट्याची विधीवत पूजा करून वाजत गाजत मिरवणूकीने देवीची मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना केली .
लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी देवीचा चांदीच्या देवीचा मुखवट्याची चोरी केल्याबाबत गुन्हा नोद करण्यात आला होता. लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम यांनी तत्काळ तपास पथक तयार करून देवीचा मुखवटा शोधण्यासाठी पाठविले . तपास पथकाने अज्ञात आरोपीताबाबत कोणतीही माहिती नसताना व घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज बंद असताना तांत्रिक विश्लेषण व इतर ठिकाणाच्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस शिपाई कादिर शेख, अमोल गायकवाड यांनी आरोपी निष्पन्न केले . पोलीसांनी सापळा रचुन आरोपी शिवराम पापा काळे ( वय ४७ वर्षे, रा. सुरक्षानगर, येरवडा) यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली . त्यांच्याकडून यल्लमा देवीची चांदीची एकुण ७०० ग्रम वजनाचे किंमत रुपये एक लाख ८४ हजार रक्कमेचा चांदीचा मुखवटा हस्तगत करण्यात आले. दरम्यान कोणाच्याही धार्मिक भावना न दुखवता चांदीचा मुखवटा परत केला. यावेळी तृतीयपंथीय समुदायाने देवीच्या मुखवट्याची विधीवत पूजा केली. त्यांनी पोलीसांचा सत्कार करून देवीची वाजतगाजत मिरवणूक काढली. त्यानंतर मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना केली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार , सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा , अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील , परिमंडळ चारचे उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जैतापुरकर यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई , सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, पोलीस शिपाई अमोल गायकवाड, अमोल वायाळ , कादिर शेख, अतुल जाधव, अक्षय शिंदे, राहुल परदेशी यानी ही कामगिरी केली .