यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ घडविणार ‘डॉग प्रशिक्षक’
पाळीव कुत्रयांची वंशावळ, ॲंटीरेबिज व नसबंदीचा माहिती देणार;कुत्र्यांना स्वच्छते बाबत देणार प्रशिक्षण
येरवडा: कुत्रा सांभाळणे हे अनेकांना अवघड जाते . कुत्र्याने घेतल्यास मालकाला इतरांच्या रोषाला सामोरे जावे लागते. तर परिसर असो कि सोसायटी मध्ये कुत्र्याने मल-मूत्र केल्यास त्यांच्या मालकांना भांडणाला सामोरे जावे लागते. अनेक सोसायट्यांनी ‘ पेट पॉलिशी’ अंतर्गत कुत्रा सांभाळणाऱ्यांसाठी अनेक नियम केले आहेत. त्यामुळे कुत्रा सांभाळण्याच्या आवडीला अनेकांना मुरड घालावी लागते. यावर आता नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने ‘ डॉग प्रशिक्षक’ हे प्रशिक्षण सुरू केले आहे. हे प्रशिक्षक कुत्रा सांभाळणाऱ्यांना ॲंटीरेबिज , नसबंदी एवढीच माहिती देणार नाही तर संबंधित कुत्रांचे वंशावळ सुद्धा देणार आहेत.
राज्यातील अनेक शहरात पाळीव कुत्रांची संख्या अधिक आहे. अनेकजणांना कुत्रा सांभळताना अनेक अडचणी येतात. त्यांना ॲंटी रेबीजची लस देणे, आरोग्य परवाना घेणे, नसबंदीची माहिती देणे, यासह कुत्र्यांना योग्य ठिकाणी मल- मूत्रा बाबत प्रशिक्षण देणार प्रशिक्षक आता उपलब्ध होणार आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आता ‘डॉग प्रशिक्षक’ चे कार्स सुरू करीत आहे. त्यामुळे अनेकांना कुत्रा सांभाळण्याची आवड जोपासता येणार आहे.केंद्र सरकारच्या नवीन नियमावलीनुसार कुत्रा पाळण्यासाठी परवाना आवश्यक आहे. अनेक शहरात पाळीव प्राण्यांची नोंदणी ऑनलाईन प्रक्रिया आहे. पाळीव कुत्र्यांना प्रमाणपत्र ( जेथून कुत्रा खरेदी केले होते) जातीचा प्रकार आणि पशु वैद्यकीय आणि लसीकरण तपशील अपलोड करणे आवश्यक असते. यासह पशु वैद्यकीय डॉक्टरांकडून रेबीज इंजेक्शन प्रमाणपत्र, नसबंदी आणि लसीकरणाचे कागदपत्रे सादर करणे करणे आवश्यक असते. याची सर्व माहिती आता कुत्रा सांभाळणाऱ्या मालकांना हे ‘डॉग प्रशिक्षक’ देणार आहेत.
मालकांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांचे लसीकरण आणि निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असते. लसीकरण किंवा नसबंदी करण्यासाठी उशीर झाल्यास काही महापालिका दंड आकारतात. पाळीव कुत्री सार्वजनिक ठिकाणी शौच करत असतील तर त्यांची साफ सफाई करण्याची जबाबदारी मालकाची असते. पाळीव प्राण्याने एखाद्याला इजा केल्यास संबंधित मालकाला दंड आकारला जातो. यासह जखमी व्यक्ती किंवा प्राण्यांच्या उपचाराचा खर्च देखील मालक देतीला असा नियम काही शहरातील आरोग्य विभागाने केल्या आहेत. मात्र, पुणे शहरात आरोग्य विभागाने नियम केले नसले तरी अनेक सहकारी गृह निर्माण सोसायट्यांमध्ये ‘ पेट पॉलिशी’ अंतर्गत हे नियम केले आहेत.‘‘ कुत्रा सांभाळणे हे आजच्या काळात अवघड झाले आहे. अनेक सोसायट्यांमधील ‘पेट पॉलिशी’ मुळे कुत्रयाच्या मालकांना कुत्राचे शौच साफ करावे लागते. तर कुत्रयांना योग्य प्रशिक्षणासह त्यांना ॲंटीरेबीज इंजेक्शन देणे,नसबंदी, त्यांच्या वंशावळीची माहिती आवश्यक असते. त्यासाठी डॉग प्रशिक्षण कोर्स सुरू करीत आहोत. ’
– प्रा. संजीव सोनवणे, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ,
पाळीव एखाद्या नागरिकाला चावल्यास त्याच्या मालकावर पोलीस ठाण्यात गुन्ह्य दाखल होतो . मात्र याची माहिती कोणाला नसते. पाळीव कुत्र्याला बाहेर फिरायला जाताना त्याच्या तोंडाला जाळी लावणे आवश्यक असते. अनेक जण कुत्र्याला फिरायला नेताना त्याच्या तोंडाला जाळी किंवा मास्क लावत नाही .