सुरक्षित वस्ती , सुरक्षित आम्ही
युथ फॅार चेंजचा वस्ती पातळींवर उपक्रम ; असुरक्षित ठिकाणांचे केले मॅपिंग
येरवडाः वस्त्यांमधील सुरक्षित व असुरक्षित ठिकाणे कोणती आहेत. असुरक्षित ठिकाणांचे मॅपिंग युथ फॅार चेंजच्या संस्थेतील युवतींनी केले आहे. यासह येरवड्यातील वस्त्यांमधील दोनशे मुलींनी सांगितलेल्या अनुभव कथनाचे संकलन संस्थेने केले आहे. याचा अहवाल पोलीस उपायुक्त यांना देण्यात येणार आहे.
येरवड्यातील लक्ष्मीनगर, रामनगर, कामराजनगर, जयजवाननगर, अशोकनगर, यशवंतनगर, गणेशनगर या वस्त्यांमधील मुली युथ फॅार चेंजच्या माणुसकी सेंटर मध्ये संगित, नृत्य, मार्शल आर्ट शिकण्यासाठी येतात. यासह दर आठवड्याला होणा-या ‘ चाय पे चर्चा’ यावर चालु घडामोडींवर संवाद साधतात. या संवादातून मुलींना वस्त्यांमध्ये कोणकोणत्या समस्या आहेत, मुलींची छेडछाड होते अशा असुरक्षित ठिकाणांची यादी तयार केली .
सुरक्षित वस्ती , सुरक्षित आम्ही ‘ या उपक्रमा अंतर्गत शिक्षण सुरू असलेल्या व शिक्षण अर्धवट सोडलेल्या मुलींची यादी, या मुलींची भुतकाळात छेडछाड झाली होती का, मैत्री व प्रेम म्हणजे काय व त्यातील फरक, पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची पद्धती नाहित आहे का , महिला व मुलींसाठीचे कायदे या बद्दलची माहितीचे संकलन करण्यात आले आहे.
युथ फॅार चेंज संस्थेत काम करत असताना सामाजिक दृष्टी मिळाली आहे. युवकांची बेरोजगारी, व्यसनाधीनताही एक समस्या असुन छेडछाडी का होते या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. संस्थेत अनेक युवकांना सहभागी करून क्रिडा स्पर्धाच्या माध्यामातून त्यांची ऊर्जा विधायक उपक्रमात वळविण्याचा प्रयत्न करीत आहे.”
– कौस्तुभ भामरे, युवा समन्वयक, युथ फॅार चेंज
“ वस्त्यांमध्ये अनेक समस्या आहेत. या समस्या कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आवाज आमचा, सेफ ॲंण्ड अनसेफ अशा विविध उपक्रमातुन मुलींशी संवाद साधत आहे. त्यांच्या समस्या निवारण्याचा प्रयत्न करीत आहोत.”
– रूची पंडित , विद्यार्थींनी
युथ फॅार चेंजचे पदाधिकारी साधणार पोलीस उपायुक्तांशी संवाद
वस्त्यांमध्ये छेडछाड होणा-या असुरक्षित ठिकाणांची यादी व दोनशे मुलींना विचारलेल्या प्रश्नावलीची सांख्यिकी अहवाल तयार केले आहे. हा अहवाल परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्तना देण्यात येणार आहे. त्यावेळी युथ फॅार चेंज चे पदाधिकरी वस्त्यामध्ये होणारी छेढछाड यावर पोलीस उपायुक्त यांच्या बरोबर संवाद साधणार असल्याचे अनुष्का जाधव यांनी सांगितले.
–